By : Polticalface Team ,Sat Aug 27 2022 15:16:59 GMT+0530 (India Standard Time)
डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाँडेशन व नॅशनल युथ अॅवॉर्डीज फेडरेशन ऑफ इंडिया ही संस्था देशपातळीवर उपेक्षीत, वंचीत व प्रसिध्दीपासुन दूर असलेल्या परंतु सामाजिक व वैयक्तीक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणा-या तसेच स्वतःच्या वैयक्तीक जीवनात प्रचंड संघर्ष करुन जीवनामध्ये यशस्वीतेचे शिखर गाठत असताना स्वतःच्या व कुटुंबाच्या सबलीकरणाबरोबरच सामाजीक बांधीलकी स्विकारुन देशउभारणीत खारीचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांना संस्थेतर्फे स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक देवून सत्कार केला जातो. चालू वर्षी महाराष्ट्रातून १० व्यक्तींची निवड या संस्थेने केली असुन त्यामध्ये श्रीमती शिंदे यांचा समावेश आहे.
श्रीमती शिंदे या कोरेगांव मुळ (ऊरुळी कांचन) येथील शितोळे-देशमुख परिवारातील कन्या असुन मढेवडगांव येथील पोपटराव शिंदे यांच्याशी विवाह झाल्यानंतर दुर्देवाने दोन वर्षातच पतीचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर अस्मानी दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु वडीलांच्या व कुटुंबियांचा खंबीर साथीने त्या उभ्या राहिल्या. पदवीपर्यंतचे शिक्षण घेवून काही काळ शिक्षणसेवक म्हणुन काम केले. याकाळात तेथील वीट भट्टीवरील मजूरांच्या मुलांना पाटी पेन्सील आणुन देवून स्वतः शिकविण्याचे काम केले. परंतु स्वतःचा उद्योग सुरु करण्याच्या उर्मीने त्यांनी प्रचंड संघर्ष करुन व परिश्रम घेवून सन २०१३ मध्ये मढेवडगांव येथे नगर-दौंड रोडवर प्रतिक फ्युएलिंग सेंटर हा पेट्रोलपंप सुरु केला. याकामी त्यांना वडील आबासाहेब शितोळे देशमुख व दिर जिजाबापू शिंदे यांनी मोलाचे पाठबळ दिले. स्वतः चारचाकी गाडी चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. ऐन तारुण्यात व खेळण्या बागडयाच्या वयात आलेल्या अघोरी संकटांवर मोठ्या धिरोदात्तपणे मात करुन आज त्या यशस्वीतेच्या शिखरावर उभ्या आहेत. पेट्रोल पंपाबरोबरच पारंपारीक शेतीचा व्यवसाय समर्थपणे सांभाळात आहेत. त्यांचा मुलगा आज लंडनमध्ये एम.बी.ए.चे शिक्षण घेत आहे.
ही वाटचाल करत असताना सामाजिक बांधीलकी स्विकारुन कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करणे, गोर-गरीब व अनाथ मुलांना शिक्षणासाठी सहाय्य करणे, अनाथाश्रमातील मुलांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे याकरीता वॉटर फिल्टर बसवून देणे, एका शाळेसाठी पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देणे अशी महत्वपुर्ण कामे केलेली आहेत. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मढेवडगांव माध्यमिक विद्यालयातील १२०० विद्यार्थ्याना पेरु, फणस व आवळयांच्या रोपांचे वितरण त्यांनी केले असुन खेळामध्ये नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव करुन त्यांना प्रोत्साहीत केले आहे.
शितोळे परिवाराकडून मिळालेले संस्कार व शिंदे परिवाराची असणारी सामाजिक बांधीलकी स्विकारुन श्रीमती नयततारा शिंदे यांनी स्वतःवर कोसळलेल्या अस्मानी संकटामध्ये खचून न जाता मोठ्या घिराने व संयमाने सामना करत जी वाटचाल केलेली आहे ती अतिशय कौतुकास्पद व अभिनंदणीय असुन प्रेरणादायी आहे. वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष