By : Polticalface Team ,Sat Aug 27 2022 17:23:45 GMT+0530 (India Standard Time)
दौड पुरंदर बारामती तालुक्यातील जिरायत भागात पाणी प्रश्नावर, आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत विचारलेल्या जोरदार प्रश्नावर अधिवेशन लक्षवेधी ठरले आहे. या योजनेचा फायदा दौंड तालुक्यातील ताम्हणवाडी, बोरीऐंदी, बोरीभडक, डाळिंब, भांडगाव, खोर, पडवी, देऊळगावगाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणी गाडा, रोटी, जिरेगाव, पांढरेवाडी, या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिरायत व दुष्काळी परिस्थितीचा काया पालट झाल्या शिवाय राहणार नाही, असे मत कुल यांनी व्यक्त केले, दौंड तालुक्याच्या उशाशी जल वाहिणी, जनाई शिरसाई व पुरंदर जलसिंचन योजना कार्यन्वित आहेत. मात्र या पाण्याचा उपयोग दौंडकर जनतेला आज पर्यंत निश्चित स्वरूपात फायदा झाला नाही. असे परखड मत विधानसभेत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले,
दौंड तालुक्यातील या गावांना पाण्याच्या प्रश्नावर महत्वपूर्ण भूमिका व दुष्काळी गावांना न्याय मिळवा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे. जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता, 13,835, हेक्टर असून, पुरंदर उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता ही 25,753 हेक्टर इतकी आहे. दौंड, पुरंदर बारामती तालुक्यातील जिरायती व दुष्काळी भाग असल्याने पिण्याचे पाणी व चिंतनाच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून या दोन्ही सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जानाई शिरसाई योजनेसाठी, 3.60 टी एम सी, तर पुरंदर योजनेसाठी, 4 टीएमसी पाणी साठा राखीव ठेवण्यात येऊन देखील पुरेशा प्रमाणात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जात नाही, हि मोठी शोकांतिका आहे, हि योजना सुरू होऊनही पूर्ण क्षमतेने चालू नाही, योजनेसाठी करण्यात आलेल्या पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती दिसून येते, दौंड च्या दक्षिण भागातील अनेक गावे अद्यापही या पाण्या वाचुन वंचित असल्याचे महाराष्ट्र राज्य विधानसभेत अँड राहुल कुल यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
दौंड पुरंदर बारामती तालुक्यातील जलसंपदा विभागाने यापूर्वी तयार करून दिलेले पाझर तलाव, लघु पाटबंधारे तलाव, यांची संख्या कमी प्रमाणात असल्याने, व आहेत त्या गावातील तलाव खोली रुंदी अपुरी असल्याने पाणी साठा पुरेसा होत नाही, त्यामुळे पाझर तलावांचे नव्याने समाविष्ट करण्याची व तलावांचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. खोर डोंबेवाडी, तलावात पाईप द्वारे पाणी साठा, व पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत व संघर्ष करण्या पासून या गावांची कायम स्वरूपी थांबवावी अशी मागणी करत सरकार दरबारी खुलासा करीत, सभागृहाच्या निदर्शनास, अँड राहुल कुल यांनी आणून दिली आहे. तसेच या भागातील जिरायती शेती भागाचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली आहे, फेर सर्वेक्षण करताना आवश्यक असेल त्या ठिकाणी सुधारित पद्धतीने मान्यता देऊन जानाई शिरसाई,व पुरंदर सिंचन योजनेच्या पूर्वेच्या बाजूला असलेल्या ताम्हणवाडी पासून ते शेवटच्या जिरेगाव कौठडी पर्यंत ची सर्व कामे पूर्ण करून, विशेष बाब म्हणून हे तलाव जोडण्या संदर्भाचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
यावर पाण्याची उपलब्धता पूर्णपणे तपासून पूर्ण योजनेचे फेर सर्वेक्षण करण्या बाबत महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरात लवकर या बाबत कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष