By : Polticalface Team ,04-11-2022
गुजरात विधानसभेसाठी १ व ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी आपने जोरदार तयारी उमेदवारांची यादी जाहीर केली. तर आता मुख्यमंत्रीपदाचा चेहराही जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, आप अशी तिरंगी लढत होईल. गेल्या अनेक वर्षांपासून येथे भाजप सत्तेत आहे. त्यामुळे यंदा चुरशीची निवडणूक आहे. दिल्ली, पंजाब काबीज केल्यानंतर आता आम आदमी पार्टीने गुजरातवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात आता दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे.
दिल्ली राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणुकीची घोषणा केली. ४ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर सात डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दिल्लीतील तीन महानगरपालिकेची एकत्रीकरण होऊन एक महानगरपालिका झालेली आहे. या महानगरपालिकेत २५० वॉर्ड आहेत. दिल्लीत आपची सत्ता असली तरी महानगरपालिका ही गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून ताकद दोन्ही ठिकाणी मिळू शकते. परंतु केजरीवाल हेच आपचा मोठा चेहरा आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी केजरीवाल यांच्या सभा मोठ्या प्रमाणात घ्यावा लागणार आहे. पण दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीमुळे केजरीवाल यांची मात्र कोंडी झाल्याचे राजकीय चर्चा आहे. तर केजरीवाल हे दिल्लीत अडकून पडू शकतात, असे ही बोलले जात आहे वाचक क्रमांक :