By : Polticalface Team ,04-11-2022
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड देखील सुरू करण्यात आली आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सभा घेण्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या ठाम असल्यामुळे वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे ज्या हॉटेलमध्ये थांबल्या आहेत. त्या हॉटेलच्या बाहेर साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आल्याची माहीती आहे. सुषमा अंधारे यांनीही नजरकैदे पेक्षा भयानक स्थिती असल्याचा आरोप केलाय. सुषमा अंधारे ज्या हॉटेलमध्ये थांबल्या आहेत. त्या हॉटेलबाहेर पोलिस छावणीचं स्वरूप आलं आहे
दरम्यान, जळगावात महाप्रबोधन सभेवरून राजकीय वातावरण तापलंय. सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगर येथील महाप्रबोधनसभेला प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर ठाकरे गट आक्रमक झालाय. तर मुक्ताईनगरमध्ये सभा घेण्याच्या निर्णयावर ठाकरे गट ठाम आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे वाचक क्रमांक :