By : Polticalface Team ,04-11-2022
सहारा शिनवारी हीचे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारी हिने ट्विट करत भारताला हरवण्याची मागणी झिम्बाब्वेच्या संघाकडे केली आहे. “पुढच्या सामन्यात जर त्याच्या संघाने भारताला चमत्कारिकरित्या हरवले तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन”, असे सहार शिनवारी हिने ट्विट केले. शिवाय, तिच्या या ट्विटनंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी तिला ट्रोलही केले आहे.
भारतीय संघाचा टी-20 विश्वचशकातील अखेरचा सामना 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ सध्या ब गटात 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तसेच, झिम्बाब्वेचा संघ 5 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. भारताने झिम्बाब्वेवर मात केल्यास त्यांचे 8 गुण होतील आणि उपांत्य फेरी गाठेल. वाचक क्रमांक :