By : Polticalface Team ,04-11-2022
शहाजी पाटील म्हणाले,170 आमदार मजबूतपणाने शिंदे फडणवीस सरकारच्या मागे उभे आहेत. सर्व आमदार आपल्या मतदार संघात काम चांगले करीत आहेत. त्यांना निधी मिळत आहे, जनतेची कामे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे 12 नेते फुटले आहे पण मुहुर्त अजून ठरला नाही तो लवकरच ठरेल. आमदार शहाजी पाटील हे पंढरपुरात बोलत होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांनी उद्याच्या नागपूर अधिवेशनानंतर राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडणार आहे, असे जे भाकीत केले आहे. ते विधान अत्यंत विनोदी असे आहे. त्याला कोणताही पुरावा नाही. राज्यातील १७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत वाचक क्रमांक :