By : Polticalface Team ,05-11-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०४ नोव्हेंबर २०२२, भांडगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत सर्वानुमते विविध मुद्यांवर चर्चा करून ग्रामसभेत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
भांडगाव हद्दीतील विविध कंपन्यांमध्ये गावातील स्थानिक युवकांना रोजगार आणि व्यवसायासाठी प्रथम प्राधान्य मिळावे या उद्देशाने अनेक वर्षा पासून भांडगाव पंचक्रोशीतील स्थानिक युवा तरुणांनी लढा सुरू केला होता,
भांडगाव हद्दीतील विविध कंपन्यांमध्ये रोजगार व व्यवसायासाठी प्रथम प्राधान्य मिळावे या संदर्भात युवा तरुणांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रिया ताई सुळे तसेच दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार अँड राहुल दादा कुल,यांना देखिल या संदर्भात निवेदन देण्यात आले होते, गाव गाड्यातील व राजकीय क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात मोठा युक्तिवाद निर्माण होण्याची शक्यता परीसरात वर्तवली जात होती? मात्र भांडगाव पंचक्रोशीतील स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसायासाठी प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे या मुद्यावर तालुक्यात जोरदार वादळ निर्माण होऊन चर्चेला उधाण आले होते, बेरोजगार युवकांच्या रास्त मागणीला गावातील नागरीकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता.
भांडगाव ग्रामपंचायतीने दि ०४ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, या वेळी गावातील जेष्ठ प्रमुख पदाधिकारी युवा कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामध्ये भांडगाव हद्दीतील विविध कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार व्यावसाय उपलब्ध करून देणे, या संदर्भात महेंद्र रामदास दोरगे, यांनी ठराव मांडला तर विजय शंकर शेंडगे यांनी रास्त मागणीला पाठिंबा दर्शविला आहे, या ग्रामसभेत सर्वानुमते विविध ठराव मांडण्यात आले होते, भांडगाव ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचा पुढील आराखडा तयार करून सर्वांमते मंजूर करण्यात आला आहे, गाव करील ते राव करील काय,? असा प्रश्न उपस्थित करून, गावकरी सांगतील तोच करा ठराव, असे ग्रामसेवक अधिकारी यांना सांगण्यात आले होते, या ग्रामसभेत गावातील विविध विकास कामे संदर्भात चर्चा करून बहुमताने मंजूर करण्यात आले आहेत, तसेच भांडगाव कृती समिती गट प्रमुख पदी महिंद्र रामदास दोरगे, यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, भांडगाव हद्दीतील कंपन्यांकडून, दुबार हमीपत्र लिहून घेण्या बाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे, भांडगाव हद्दीतील काही कंपन्यांनी स्थानिक युवकांना रोजगार व व्यवसायासाठी प्रथम प्राधान्य देऊ असे हमीपत्र लिहून दिले होते तरी देखील याकडे दुर्लक्ष केले होते, या पुढे कंपन्यांनी हमीपत्राचे उल्लंघन करता कामा नये, अंन्यथा याचे विपरीत परिणाम परीसरात उमटल्या शिवाय राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी प्रतिक्रिया ग्रामसभेत चर्चा व्यक्त केली जात होती.
भांडगाव हद्दीतील कंपनी व्यवस्थापकांनी ग्रामपंचायतीला पुर्वी करुन केलेले हमीपत्र रद्द करण्यात यावेत असा ठराव मंजूर करण्यात आला असून स्थानिक युवकांना कंपन्यांमध्ये रोजगार व व्यवसायासाठी प्रथम प्राधान्य मिळावे यासाठी हमीपत्र लिहून घेण्या बाबत.
ठराव मंजूर करण्यात आला आहे, तसेच भांडगाव हद्दीतील जमिन गट नंबर ४०५ सरकारी खानपड जागेत गाव विकास कामे करणे बाबत, विजय दोरगे, प्रमोद दोरगे, यांनी ठराव मांडला आहे, या वेळी भांडगाव पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक व तरुण युवकांची आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, याप्रसंगी प्रामुख्याने सरपंच मा संतोष आबा मधुकर दोरगे, उपसरपंच सौ सिंधुताई शंकर हरपळे, मा लक्ष्मणदादा बबन काटकर, सर्व सदस्य दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती मा नितीन दोरगे, महिंद्र दोरगे, विजय दोरगे, प्रमोद दोरगे, संदीप दोरगे, अमित दोरगे, विजय शेंडगे, रामदास दोरगे, नितिन जा. दोरगे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष