By : Polticalface Team ,05-11-2022
आढळगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये कांदा, कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी,फळबागा अशा इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. श्रीगोंदा तहसीलदार यांनी सत्ता आदेश दिल्याने त्या आदेशाचे काटेकोर पालन करताना शासकीय कर्मचारी यांच्याकडून प्रत्यक्षात बांधावर जाऊन पिक पाहणी करून पंचनाम्यांना वेग आला आहे. प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना त्याचा जास्त मोबदला कसा देता येईल याचा प्रयत्न शासनाने करावा असी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी कृषी अधिकारी पी.जी. देवकाते, तलाठी कांबळेसाहेब तसेच शेतकरी जालिंदर बोडके,धनु काळे शेजारील इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात पंचनामे करत असताना उपस्थित होते. वाचक क्रमांक :