By : Polticalface Team ,05-11-2022
अहमदनगर : भाजपच्या 105 मध्ये अस्वस्थता आहे. कारण हे सरकार 40 जणांसाठीच काम करत असल्याची भीती भाजप नेत्यांमध्ये आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिर्डी येथे कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. शिबीरात शेवटच्या दिवशी पाटलांनी पक्षाचे नवनवीन व्हिजन मांडत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला.
पाटील म्हणाले, सरकार गेलं की चिंता करायची नाही. एवढं काम करु की महाराष्ट्राचे चित्र पालटण्याची ताकद आपल्यात आहे. आम्हाला हिंदूत्व कुणाकडून शिकण्याची गरज नाही. आमचं हिंदूत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे सांगतानाच आपल्यात एकतेचा अभाव होता कामा नये. संकट आलं की, पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. आत्मविश्वास ठेवा. कुठल्याही मंत्री किंवा आमदारांनी एवढ्या वर्षात चुकीचे कधी काम केले नाही. त्यामुळे आपल्या कुणावर संकट आले तर ताकदीने उभे रहा, असे आवाहनही पाटलांनी केले.
राष्ट्रवादी व पवारसाहेब काय करतात? याबाबत राज्यात चर्चा असते. आपण कुणाशी लढणार आहोत याचे मार्गदर्शन दोन दिवस या शिबीरात झाले. आईवडिलांना शिव्या द्या पण मोदींना नको बोलतात त्यांच्याविरोधात आपली लढाई आहे असेही जयंत पाटीलांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांना दारु पिता का? असं विचारणारा मंत्री या मंत्रीमंडळात आहे. हे कोणत्या पातळीवर आहेत लक्षात येत आहे त्याविरोधात आपली लढाई असल्याचे पाटील म्हणाले. अतिवृष्टी झाली त्या सर्व ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करणारा ठराव या शिबिरात करण्यात आला.
महाराष्ट्रासोबत दुसरं राज्य स्पर्धा करु शकत नाही परंतु घाबरुन दुसर्या राज्यात जाणारा प्रकल्प थांबवला जात नाही, याबाबत तीव्र नाराजी देखील पाटलांनी व्यक्त केली. पूल पडणे हा ईश्वरी संकेत असे मोदी पश्चिम बंगालच्यावेळी बोलले असतील तर आता गुजरातमध्ये हा संकेत दिसला पाहिजे, असा खोचक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
विधानसभेत आपल्या आमदारांनी चांगली कामगिरी केली आहे. रोहित पवार, अनिल पाटील, अमोल मिटकरी, यांच्यासह अनेक आमदारांना विधानसभेत थांबा असं बोलावं लागतं आहे, अशी कामगिरी आहे. ही नवीन पिढी राष्ट्रवादीचा रथ पुढे नेल्याशिवाय राहणार नाही असा पाटील यांनी व्यक्त केला. 23 वर्षात चार वेळा सत्ता स्थापन करायला मिळाली आहे. महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन आपला पक्ष काम करतोय. 2024 ला राष्ट्रवादीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. 25 वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे ताकदीने काम केले तर एक नंबरचा पक्ष बनेल असे आवाहनही पाटील यांनी केले.
महागाई वाढली आहे. गॅसची सबसिडी दिली नाही हे लोकांना सांगण्याची गरज आहे. भाजपच्या कामाने जनतेच्या मनात निराशा वाढलीय. भाजप शंभर टक्के संसदेत निवडून जाणार असे चित्र निर्माण केले जात आहे परंतु आकडेवारी पाहिली तर याला छेद देणारे चित्र आहे असेही पाटील यांनी आकडेवारी सांगत स्पष्ट केले.
सध्या 50 खोक्यांची चर्चा जोरदार सुरू आहे. शेंबड्या पोरांनाही ही चर्चा माहीत झाली आहे म्हणून हीच शेंबडी पोरं नागपूरात जाऊन आंदोलन करत आहेत असा टोलाही पाटील यांनी फडणवीस यांना लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे तरीही राष्ट्रवादी लढा देत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे आव्हान देणारा एकमेव पक्ष आहे त्यामुळे हल्ला होत आहे, असेही पाटील म्हणाले.
भूमिका आणि नवीन जबाबदारी याबाबतही जयंत पाटील यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, पक्षात एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता पुढे आला पाहिजे. एनसीपी अॅप तयार करण्यात आले आहे. यामध्ये तुम्ही काय करता? इथपासून तुम्हाला माहिती देण्याची सुविधा, संवाद, उपक्रम यामध्ये असणार आहे. नेत्यांना भेटण्यापेक्षा मेरीटनुसार प्रत्येकाला संधी दिली जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
डिसेंबरमध्ये पक्षाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि रिजनलप्रमाणे निवडणूक घेतली जाईल. पक्षात सुवर्ण संधी, सुवर्ण वेळ, विजयाचे सहा स्तंभ आपण आणणार आहोत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आपलं अपयश झाकण्यासाठी टिव्हीवर दाखवले जातात. त्यावेळी त्यांचे अपयश काय आहे शोधायला हवे? हे एकसंघपणे काम करायला हवे. लीडर मॅपिंग सारखी एक सामुहिक जबाबदारी दिली जाणार आहे. स्वतः जिंकणाऱ्या सोबत अजून एक जिंकवण्याची जबाबदारी आहे. आपण ताकदीने एकत्र काम केले तर राज्यात शंभरी गाठायला वेळ लागणार नाही, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष