सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,05-11-2022
पालघर : टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा गुजरातहून मुंबईकडे कारने जाताना पालघरमधील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी अनाहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस पंडोले गंभीर जखमी झाले होते. अपघातावेळी मुंबईमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोले या कार चालवत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कार चालवणाऱ्या अनाहिता पंडोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.
उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला कार चालक डॉ. अनाहिता पंडोल यांच्यावर कलम 304 (अ ), 279, 337, 338 प्रमाणे पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपघातावेळी सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. तर, अनाहिता पंडोले आणि डेरियस पंडोले पुढे बसले होते. कार अनहिता पंडोले चालवत होत्या. या अपघातामध्ये मागच्या सीटवर बसलेल्या सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, पंडोले पती-पत्नी या अपघातात जखमी झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं होतं, की मागे बसलेले मिस्त्री आणि जहांगीर पंडोले या दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नव्हता. यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, मर्सिडीजनं मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावरील पालघरमधील चारोटी चेकपोस्ट पार केल्यानंतर नऊ मिनिटांत 20 किलोमीटर अंतर कापलं होतं. म्हणजेच गाडीचा वेगही जास्त होता. अपघातानंतर पंडोले पती-पत्नी गंभीर जखमी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत होते. सध्या डॉ. अनाहिता पंडोले या रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेताहेत, त्यांचे पती डेरिअस पंडोले यांना डिस्चार्ज दिल्यानंतर पालघर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अपघाताबाबत दोन महिन्यानंतर त्यांचा जबाब नोंदवून घेतलाय
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.