वरवंड गावचे ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज(शंभु महादेव) यात्रा उत्सव सोमवार पासून सुरवात
By : Polticalface Team ,06-11-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,०६ नोव्हेंबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे वरवंड गावचे ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज(शंभु महादेव) यात्रा उत्सव सोमवार दि,०७ आणि मंगळावर दि,०८ रोजी संपन्न होणार असून या निमित्ताने श्री गोपीनाथ मंदिर परिसर तसेच गावातील प्रमुख धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई रंगरंगोटी करण्यात आली आहे, मौजे वरवंड ग्रामस्थांच्या वतीने या दोन दिवसात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार दि ७ रोजी पहाटे-मध्यरात्री महादेवाचा महाभिषेक,भाविकांचे नवसाचे ध्वज आणि दंडवत, रात्री ७ वा ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात छबिना पालखी मिरवणूक आणि मानकरी पाटलांचा लोटांगण सोहळा,
रात्री श्री गोपीनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात वसंतराव नांदवळकर लोकनाट्य बहुरंगी तमाशा मंडळाचा कार्यक्रम आणि मंगळवारी दि ०८रोजी स. ९ वा, तमाशा मंडळाचा हजेरीचा कार्यक्रम संपन्न होईल, तसेच त्याच दिवशी सायं ४ वा, भव्य कुस्ती आखाडा आणि रात्री ८ वा. जि प प्राथमिक शाळा प्रांगणात, रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होतील, या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा वाढवण्याची संयोजकांनी अहवान केले आहे,सर्वांनी यात्रा महोत्सव सोहळ्याचा आनंद साजरा करावा, आणि शिस्तबद्ध देवदर्शन घ्यावं,आपल्याकडील मौल्यवान वस्तू लक्ष पूर्वक सांभाळुन काळजी घ्यावी, मौजे वरवंड येथील पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी यवत पोलीस पथकाने दक्षता घ्यावी, महामार्गावरील वाहनं पार्किंग मुळे वाहतूक कोंडी होऊ नये, गावातील स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्त्याना,पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांना तसेच पी एम पी एल बस कर्मचारी, एस टी महामंडळ यांना सहकार्य करावे,महिला आणि मुलांच्या खेळणीच्या,खाऊच्या दुकानांमधील गर्दी नियमित आणि नियंत्रित करण्यासाठी सहकार्य करावे,
पाळणे आणि लहान मुलांच्या राडघाडगे खेळ या ठिकाणी महिला वर्गाला त्रास होईल असे कोणतेही टवळखोरी कृत्य कोणी करु नये,
पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहन समस्त ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी व ग्रामपंचायत वरवंड यांचेकडून करण्यात येत आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी