शिक्षण व्यवस्थेवरून मंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतली मुख्याध्यापकांची शाळा

By : Polticalface Team ,06-11-2022

शिक्षण व्यवस्थेवरून मंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतली मुख्याध्यापकांची शाळा अहमदनगर : आज शिक्षणाव्यतिरिक्त अनेक कला कौशल्य, विद्यार्थ्यांना शिकविणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आजकाल कालबाह्य शिक्षण सोडून विकसित व अद्यावत शिक्षणाकडे आपला कल हवा. शाळेतील शिक्षण असतानाही विद्यार्थी आज कोचिंग क्लासेस मध्ये जातायत हे शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे. याच आपण आत्मपरीक्षण करायला हवे अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढले. तसेच यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक तसेच मुख्याध्यापकांना यावरून चांगलेच झापले.

राज्यस्तरीय मुख्याध्यापक वार्षिक शैक्षणिक अधिवेशन या कार्यक्रमाचे आयोजन नगर शहरातील सहकार सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिक्षण व्यवस्था तसेच खासगी कोचिंग क्लासेसचा वाढत प्रभाव यावर भाष्य केले.

गेली दोन वर्षे कोरोनाचा काळ होता, यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवासात कसे आणता येईल त्याची आपण चर्चा केली पाहिजे. ऑनलाइन शिक्षण पद्धती स्वीकारल्या पाहिजे.

आता या नवीन डिजिटल युगामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेल्याशिवाय पर्याय नाही. हे आता गोष्ट मान्य झालेली आहे ती मात्र जगाने स्वीकारण्यापूर्वी आपल्या देशाने ती स्वीकारले याचे कौतुक केलं पाहिजे. डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील परंतु त्याचे ज्ञान आपण आत्मसात करणं, त्या तंत्रज्ञानावर आधारित आपण आपल्या शिक्षणाच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे हे आवश्यक आहे.

24 तास खुल्या राहणाऱ्या अभ्यासिका सुरु करणार माझ्या मतदार संघात 24 तास खुल्या राहणाऱ्या अभ्यासिका सुरु करणार आहे. विशेष म्हणजे या सर्व अभ्यासिका विनामूल्य असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची देखील सोयीसुविधा देखील उपललब्ध करून देणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था सुधारण्यात भर पडेल.

नवीन बदलत्या व्यवस्थेत चांगल्या सूचना करण्याच्या गरजेच्या आहेत. आपण आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला तरच विद्यार्थी आणि शिक्षकांमधील अंतर कमी होईल.असा सल्लाही यावेळी विखेंनी उपस्थित शिक्षकांना दिला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.