ज्योती शिंदे यांना आंतरभारतीचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार
By : Polticalface Team ,06-11-2022
आंबाजोगाई :
आंतरभारती, आंबाजोगाईचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार यंदा ज्योती शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
श्रीमती ज्योती शिंदे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असून उत्कृष्ट सूत्रसंचालक अशी त्यांची ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांचे व्याख्याने गाजली आहेत. आंतरभारती, आंबाजोगाईच्या त्या कार्यकारिणी सदस्य आहेत. या वर्षी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या संयोजक म्हणून त्यांनी मुख्य भूमिका बजावली. विद्यार्थिनी सहाय्यता निधीच्या पायाभरणीचे काम त्या करीत आहेत.
आंतरभारती, आंबाजोगाई दर वर्षी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देते. या पूर्वी डॉ. अलका वालचाळे, संतोष मोहिते, वैजनाथ शेंगुळे, दत्ता वालेकर, राजेंद्र पिंपळगावकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 25 डिसेंबर रोजी उदगीर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्नेहमीलन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी ज्योती शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :