सुवर्णपदक विजेत्या सौ. अश्विनीताई सचिन दळवी यांचा आनंदवाडी ग्रामस्थांकडून सत्कार....
By : Polticalface Team ,07-11-2022
काष्टी आनंदवाडी:
राष्ट्रीय कॅटल बॉल स्पर्धेमध्ये भारताला स्वर्णपदक जिंकून देणाऱ्या सौ अश्विनीताई सचिन दळवी यांच्या सत्कारासाठी ग्रामपंचायत आनंदवाडी च्या वतीने सत्कारसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदवाडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री सुदामराव नलावडे हे होते .
मागील आठवड्यात दिल्ली येथे पार पडलेल्या कॅटल बॉल स्पर्धेत सौ.अश्विनीताई दळवी यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून स्वर्णपदकावर आपले नाव कोरले ,यासाठी त्यांना त्यांचे पती एस.डी. जिमचे संचालक श्री सचिन दळवी यांचे मार्गदर्शन लाभले .सासरे श्री नानासाहेब दळवी यांनी प्रोत्साहन दिले.
यावेळी शुभेच्छा देताना श्री. हरिश्चंद्र शिंदे सर म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये मोठे होण्याची संधी मिळत असते, त्या संधीचं सोनं प्रत्येकाने करायला हवे ,योग्य मार्गदर्शन मिळाल्यास, इच्छा, संधी, कौशल्य या त्रीसूत्रीच्या जोरावर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. संचित उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री विजय वांगणे यांनी अश्विनी ताईंचे यश खरोखरच सर्व महिलांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री नारायण गिरमकर यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन गावचा नावलौकिक वाढवला पाहिजे. व प्रत्येक अडथळ्यांना पार करून मिळवलेले यश हे खूप आनंद देणारे असते. असे सांगितले.
माजी मुख्याध्यापक श्री दळवी सर यांनी आपल्या मुलांना आवडीप्रमाणे क्षेत्र निवडू द्या व ज्या क्षेत्रात त्यांना करिअर करावयाचे आहे. त्या क्षेत्रासाठी प्रोत्साहन देण्याचे आव्हान ग्रामस्थांना केले . तर सत्काराला उत्तर देताना श्री सचिन दळवी यांनी अश्विनीताईंनी घेतलेल्या कष्ट व मेहनतीचे हे फळ असल्याचे सांगितले , स्पर्धेतील सर्व गोष्टी नवीन होत्या, मात्र आत्मविश्वासाने कार्य केल्यास यश नक्की मिळते. ताईंनी स्पर्धेची तयारी कशी केली त्याबद्दल सांगितले व आपण केलेल्या सत्काराने माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे असे सांगून सर्वांचे ऋण व्यक्त केले. आपल्या अध्यक्षिय भाषणात सरपंच श्री सुदामराव नलावडे यांनी सौ.अश्विनी दळवी यांनी
आनंदवाडी गावचे नाव देशात गाजवल्याचा अभिमान सर्व ग्रामस्थांना आहे ,असे गौरवोद्गार काढले . यावेळी उपसरपंच कोमलताई गिरमकर, श्री. सोपानराव ढमढेरे ,श्री नानासाहेब कणसे श्री.पोपटराव खामकर ,श्री सुनील गिरमकर सर श्री.पोपटराव वाघ श्री.पांडुरंग गिरमकर,श्री. देवराम गिरमकर, श्री.ज्ञानदेव खामकर श्री शहाजी खामकर , श्री.किशोर गिरमकर ,श्री सागर थोरत, श्री संपत वाघ ,श्री प्रमोद खामकर,तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री दादासाहेब गिरमकर सर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन उपसरपंच पती श्री राहुल गिरमकर यांनी केले. कार्यक्रम उत्साहात पार पडला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.