रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यामुळे राजेंद्र म्हस्के यांचे खड्ड्यात बसून आंदोलन...!!
By : Polticalface Team ,07-11-2022
श्रीगोंदा/प्रतिनिधी
दि.०८/११/२०२२
तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे.अनेक प्रमुख रस्ते मागील काही दिवसांपासून पासून नादुरुस्त झालेले आहेत. जागोजागी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना दैनंदिन वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे.त्यामुळे तातडीने सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे पूर्वभागातील शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी केली होती.परंतू निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने राजेंद्र म्हस्के व या भागातील नागरिकांनी श्रीगोंदा-कर्जत या मार्गावरील घोडेगाव याठिकाणी खड्ड्यात बसून आंदोलन केले.
दरम्यान राजेंद्र म्हस्के म्हणाले की,निवेदन देऊन दहा दिवस झाले असून अद्याप खड्डे बुजवण्यास सुरुवात केली नाही.म्हणून आज खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.तालुक्याची "आंधळं दळतंय व कुत्रं पीठ खातयं" अशी अवस्था आहे.सर्व सामान्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी व प्रस्थापित नेत्यांचे लक्ष नाही.नेत्यांच्या गाड्या लक्झरीयस असल्यामुळे बहुतेक त्यांना रस्त्यावरिल खड्डे जाणवत नसतील परंतु सर्वसामान्य दुचाकी वर चालणाऱ्या लोकांना भयंकर त्रास होत आहे. आता कारखाना सुरू झाल्यामुळे वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी निदान खड्डे बुजविण्याचे गरजेचे आहे.आठ दिवसांत खड्डे बुजवून झाले नाहीत तर रास्तारोको करून तीव्र आंदोलन करणार असे त्यांनी सांगितले.
या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री.बावस्कर साहेब यांनी आंदोलन स्थळी जाऊन लेखी आश्वासन दिले.शाखा अभियंता म्हणाले कि, तालुक्यातील सर्वच रस्ते आम्ही बुजविणार आहोत.काही ठिकाणी आम्ही खड्डे बुजवण्यास सुरुवात देखील केली आहे.श्रीगोंदा - घोडेगाव-हिरडगाव या रस्त्याचे टेंडर झाले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.परंतू आत्ताची रस्त्याची दुरावस्था पाहता आम्ही दोन दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम सुरू करणार आहोत.
लेखी आश्वासन दिल्यानंतर राजेंद्र म्हस्के व या भागातील नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलना दरम्यान या भागातील लोकांनी होणारा त्रास सांगत हळहळ व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.यावेळी घोडेगावचे माजी सरपंच श्री.लक्ष्मण मचे, उपसरपंच दादा दरेकर, हिरडगावचे माजी सरपंच दत्तात्रय भुजबळ,उपसरपंच राजेंद्र दरेकर,चांडगावचे माजी सरपंच महादेव म्हस्के,संदिप वाघमारे, बाळासाहेब भुरे, रमेश दरेकर यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी