कोल्हापुरात साडेपाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; तिसऱ्यांदा मोठी कारवाई

By : Polticalface Team ,08-11-2022

कोल्हापुरात साडेपाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; तिसऱ्यांदा मोठी कारवाई कोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा आणि सहा महिन्यांत व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांकडून आठवड्यात तब्बल साडेपाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केलीय. पोलिसांनी सापळा रचून परीख पुलाजवळ व्हेल माशांची उलटी घेऊन चाललेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दोन किलो 15 ग्रॅम वजनाची उलटी जप्त केलीय. बाजारात याची किंमत साधारण दोन कोटी एक लाख रुपये इतकी असल्याची माहिती मिळालीय. आठवडाभरापूर्वी कारवाई करताना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद करत तब्बल 3.41 कोटी रुपये किमतींची तीन किलो 413 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली होती. त्यामुळं कोल्हापूरमध्ये आठवडाभरात साडे पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात ही सहा महिन्यांत तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी केलेल्या कारवाईमध्ये करण संजय टिपुगडे (वय 27, रा. राम गल्ली, कळंबा), संतोष अभिमन्यू धुरी (वय 49, सुभद्रा टावर, लिंशा हॉटेल मागे, कदमवाडी), जाफर सादिक महम्मद बाणेदार( वय 40, सुलोचना पार्क, नवीन वाशी नाका) अशी संशयितांची नावे आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित असणारी व्हेल माशाची उलटी घेऊन काहीजण शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून उलटी जप्त करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, विनायक चौगुले, प्रकाश पाटील, हरीश पाटील, संजय हुंबे, नितीन चौथे, संदीप कुंभार, शिवानंद मठपती, रफिक आवळकर यांच्यासह वनाधिकारी रमेश शंकर कांबळे व वनपाल विजय ईश्वर पाटील यांनी केली.
व्हेलची उलटी बनते कशी
व्हेल हे दात नसलेले व दात असलेले असे दोन प्रकारचे असतात. दात असलेल्या स्पर्म व्हेलची उलटी मौल्यवान मानली जाते. वैद्यकीय भाषेत याला अॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. व्हेलचे आवडते खाद्य म्हणजे म्हाकूळ आणि कोळंबी. यातील म्हाकूळचा तोंडाकडचा चोचीसारखा भाग आणि कोळंबीचा कवचाकडचा कडक भाग व्हेलला पचत नाही. तो भाग व्हेल खोल समुद्रात उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायने असतात. ही उलटी दीर्घकाळ लाटांवर तरंगत राहिल्यामुळे ती मेणासारखी बनते. तिचे वजन ५० किलोपर्यंत असू शकते. का आहे इतकी किंमतव्हेलची उलटी अत्तर उद्योगात महत्त्वपूर्ण मानली जाते. यापासून बनवलेल्या अत्तराचा वास दीर्घकाळ टिकतो. त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होत नाही. यामुळे नैसर्गिक तत्त्व म्हणून हा घटक वापरलेल्या अत्तराला मोठी किंमत मिळते. अगरबत्ती, धूप, औषध उद्योगातही या अत्तराचा वापर होतो. साहजिकच याला मोठी किंमत मिळते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे उलटीची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याच्या बऱ्याच घटना अलीकडच्या काळात उघड झाल्या आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष