कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेत उसळला जनसागर
By : Polticalface Team ,08-11-2022
नांदेड : कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा अखेर महाराष्ट्रात दाखल झाली असून आज नांदेडच्या रस्त्यावर या यात्रेसाठी जनसागर लोटला आहे. यात्रेसाठी राज्यभरातून कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी नांदेडात हजेरी लावली आहे. याप्रसंगी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठींबा देण्यासाठी टाकळी-नांदेड मार्गावर जनसागर लोटला होता. यावेळी नागरिकांकडून नफरत छोडो, भारत जोडो घोषणांनी परिसर दणाणला होता.
महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जवळपास 5 किलोमीटरपर्यंत गाड्यांसह नागरिकांची गर्दी दिसून येत होती. सकाळी ८.३० वाजता वन्नाळी गुरुद्वारा येथून पदयात्रेला सुरूवात झाली. छोटी मुले, महिला आणि युवा वर्ग मोठया उत्साहात यात्रेत सहभागी झाला होता. पदयात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने युवा वर्ग सामील झाला होता.
विशेष म्हणजे राहुल गांधींच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थीनींनी नऊवारी साडी परिधान करुन हातात तुलसी आणि घट घेऊन उभ्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या आणि घोड्यावर बसलेल्या तरुण तरुणींची शोभायात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्यापुढे हातात विना, टाळ चिपल्यांचा गजरात जय जय रामकृष्ण हरी गाणारी वारकरी भजनी समुदाय मोठ्या जोशात भजन गात होता.
तर एका मंचावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी महाराष्ट्राचं दर्शन घडवतं होते. दरम्यान, ही पदयात्रा भोपळ्याच्या टेकडीला आली तेव्हा मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वारांनी पदयात्रेचे स्वागत केल्याने यावेळी सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं.
यावेळी मावळ्याकडून "जय भवानी जय शिवाजी" अशी घोषणा देण्यात आल्या होत्या. यावेळी रस्त्याच्या बाजूला उंचावलेले झेंडे, बॅनर, पोस्टर्स आणि सुर्याच्या प्रतिकृतीमध्ये राहुल गांधी यांचे बॅनर्स सर्वत्र दिसत होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी