By : Polticalface Team ,09-11-2022
संजय राऊतांना जामीन मिळाला असला तरी आज संध्याकाळपर्यंत न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळणार आहे. त्यानंतर राऊत यांना तुरुंगाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होईल.
संजय राऊतांच्या जामिनावर ईडी हायकोर्टात जाणार आहे. तर संजय राऊत यांच्या जामिनावर ईडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांना 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते.
संजय राऊतांच्या जामिवार प्रतिक्रिया देताना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, राऊतांना जामीन मिळाल्याने आज आमच्यासाठी दिवाळी-दसरा आहे. तर त्यांनी टायगर इज बॅक असं ट्वीट केलं आहे वाचक क्रमांक :