विविध विकासाच्या कामाचा निधी मिळावा म्हणून माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

By : Polticalface Team ,10-11-2022

विविध विकासाच्या कामाचा निधी मिळावा म्हणून माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट करमाळा प्रतिनिधी: माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करमाळा मतदार संघातील विविध कामांसाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली असून यात वीज, रस्ते, आरोग्य, तीर्थक्षेत्र आदि बांबींचा समावेश आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या समोर पाटील यांनी मतदार संघातील समस्या मांडून निधी मिळावा म्हणून आग्रही मागणी केली असल्याचे समजते. यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आगामी काळात या कामांसाठी निधीची पुर्तता केली जाणार असल्याचे सांगितले गेले.

करमाळा मतदार संघातील रस्त्यांवर सुधारणा करण्यासाठी निधी मागितला यात कव्हे-भोगेवाडी ( 5 कोटी), सांगवी-सातोली (5 कोटी), वंजारवाडी-कुरणवाडी-चौफुला (5 कोटी), देवळाली-गुळसडी (5 कोटी) , कर्जत-करमाळा (3 कोटी), कोंढेज-साडे (2 कोटी 50 लक्ष), गुळसडी-सरफडोह-वरकटणे-निंभोरे-वडशिवणे (5 कोटी 45 लक्ष), कोर्टी-मोरवड-पिंपळवाडी-रोशेवाडी (1 कोटी 50 लक्ष) कोळगाव-निमगाव, वरकुटे-घोटी, घोटी-निंभोरे, निंभोरे-लव्हे (4 कोटी), रोपळे-केम-वडशिवणे-कंदर- कन्हेरगाव (3 कोटी) करमाळा-जामखेड (3 कोटी), कुगाव-चिखलठाण 1-शेटफळ-जेऊर (9 कोटी 85 लक्ष) केतूर 2 ते केतूर 1,वाशिंबे-सोगाव-राजूरी-सावडी (4 कोटी 75 लक्ष), साडे-सालसे (3 कोटी) रावगाव-वंजारवाडी चौफूला (6 कोटी), वंजारवाडी चौफुला-वीट-झरे (7 कोटी), पोपळज-केडगाव (6 कोटी 50 लक्ष), प्रजिमा 8-हिसरे (3 कोटी), केडगाव-चिखलठाण (3 कोटी 20 लक्ष), कोर्टी-मोरवड-पिंपळवाडी-रोशेवाडी रा. मा. 68 ला मिळणारा रस्ता (2 कोटी) अशा रस्त्यांच्या कामासाठी निधीची मागणी केली आहे. तसेच भगिरथ मधून पुढील गावांना 100 केव्हीए चे डिपी बसवून मिळावेत म्हणून मागणी केली यात जेऊर, वाशिंबे, लव्हे, सालसे, पोमलवाडी, हूलगेवाडी, उमरड, चिखलठाण, केम, कंदर, साडे, राजूरी, झरे, केतूर, कुंभारगाव, पोथरे, जिंती, वीट, करंजे आदिसह काही इतर गावांचाही समावेश आहे. तसेच केम ता करमाळा येथील श्री उत्तरेश्वर मंदिरास ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा म्हणून मागणी केली असून सद्या हे देवस्थान क वर्गात असल्याने जास्त प्रमाणात निधी मिळत नव्हता. वीज टंचाई दुर करण्यासाठी कविटगाव, वाशिंबे, केम, जातेगाव, राजूरी या ठिकाणच्या सबस्टेशन मध्ये 5 एम व्ही चे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवले जावेत अशी मागणी केली आहे.जनावरांच्या दवाखान्यांत सुधारणा व्हावी म्हणून कोर्टी, पांगरे, जिंती व केम येथील पशुवैद्यकीय केंद्रास श्रेणी 2 मधून 1 मधे रुपांतर करण्यात यावे अशी मागणी केली आहे.यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांच्या समवेत वाशिंबे येथील आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी