महिलांनी कोणते कपडे परिधान करावे हे रस्त्यावरचे मवाली ठरवू लागले

By : Polticalface Team ,11-11-2022

महिलांनी कोणते कपडे परिधान करावे हे रस्त्यावरचे मवाली ठरवू लागले मुंबई : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. या निमित्ताने आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच कडाडून टीका केली आहे. आज बळीराजा पंतप्रधानांना इच्छा मरणाची परवानगी मागतोय, नव्या भारतात आज महिलांनी कोणते कपडे परिधान करावेत हे रस्त्यावरचे काही मवाली ठरवू लागले. आज संविधानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याचे मनसुंबे काही लोकांच्या मनामध्ये आहे. अशा शब्दात जयंत पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पाटील म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने मी एका अत्यंत ऐतिहासिक क्षणाचा आज साक्षीदार झालो. कॉंग्रेसचे नेते मा. खा. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या यात्रेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे नेते शरद पवार यांच्यावतीने पाठिंबा देतो. राहुलजी गांधी हे फक्त चालत नाही आहेत, तर पळतही आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सुवर्ण काळ येणार हे निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, देशाच्या पहिल्या पंतप्राधनांवर चिखलफेक करण्याचे काम काहीजण करतायत. जनता हे बघतेय, नोटबंदीच्या निर्णयाला एका दिवसात परवानगी मिळते व पंतप्रधान रात्रीतून घोषणा करताय. त्यानंतर नोटा बदलीसाठी लोक रांगेत थांबली व यातच त्यांचा मृत्य झाला. हे जनता कधीही विसरणार नाही.

एकदा बराक ओबामा असं म्हणाले होते कि WHEN MANMOHAN SINGH TALKS THE WORLD LISTENS या देशाच्या पंतप्रधानांचा इतका गौरव पूर्ण उल्लेख केला गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा कॉंग्रेसचा भाऊ आहे, कायमच आम्ही कॉंग्रेसच्या विचार आणि कृतीला साथ देऊ, आणि आपण एकजुटीने काम करणार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.

या देशात अनेक ऐतिहासिक पदयात्रा निघाल्या आहेत. उचललेस तू मीठ चिमुटभर, साम्राज्याचा खचला पाया... गांधीजींनी दांडी यात्रा काढली आणि स्वातंत्र्याची ठिणगी देशभर पसरली होती. महाराष्ट्र कायम परिवर्तनाला साथ देणारी भूमी आहे. इतिहास साक्षी आहे. त्यामुळे या भारत जोडो यात्रेलाही हा महाराष्ट्र मनापासून साथ देणार.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.