आवाटी येथे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी जशने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे आवाहन

By : Polticalface Team ,11-11-2022

आवाटी येथे दिनांक 12 नोव्हेंबर रोजी जशने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे आवाहन
करमाळा प्रतिनिधी हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असणाऱ्या आवाटी येथील सुफी हजरत वली चांद पाशा दर्गाह मध्ये येत्या 12 नोव्हेंबर 2022 उर्दू तारीख 17 ग्यारहवी शरीफ हिजरी सन 1444 रोजी जशने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आल्याची माहिती दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी माहिती यांनी दिली.

आवाटी येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी जशने गौसे आजम निमित्त दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत जियारते मुए मुबारक आणि गिलाफे मुबारक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय तोशेकी नियाज चे आयोजन करण्यात आले आहे तसेच आलेल्या भक्तगणांना दिवसभर लंगर खाना अर्थात महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे सदर लंगरखानाचा आस्वाद भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे जसने गोसे आजम निमित्त आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये विविध प्रकार ची विद्युत रोषणाई करण्यात आली असून राज्य तसेच परराज्यातून आलेल्या भक्तगणां साठी राहण्याची व पार्किंगची व्यवस्था दर्गाह ट्रस्टच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात आली आहे.

सध्या पवित्र असा ग्यारहवी शरीफ चा महिना असून या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव बगदाद शरीफ येथील हजरत गौसे आजम यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्यारहरी शरीफ महिना मोठ्या उत्साहात साजरा करतात याचाच एक भाग म्हणून आवाटी येथील दर्गाह मध्ये गौसे आजम चा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो.

सदरच्या उपयुक्त धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन दर्गाह ट्रस्टच्या वतीने वली बाबा चे खादीम गुलामनबी कादरी तसेच इरफान कादरी याशिवाय बाबाचे दुलारे हसनैन कादरी यांनी केले आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.