By : Polticalface Team ,11-11-2022
चंद्रशेखर बावनकुळे हे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उपरोधिक टीका केली. राष्ट्रवादीने जादूटोणा करूनच उद्धव ठाकरेंना वश केले आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
या जादूटोण्याचा भोंदूबाबा कोण आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच करताच बावनकुळे म्हणाले की “भोंदूबाबा कोण आहे हे देशाला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. परत परत सांगायची गरज नाही.” एकदा शरद पवारांच्या ताब्यात कोणी आला तर तो सुटत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
तसंच जयंत पाटील यांनी सत्तेचे स्वप्न बघायला सोडायला पाहिजे. आज ही जयंत पाटील यांनी सत्ता गेल्यासारखं वाटत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील तुमची सत्ता पुन्हा कधीच येणार नाही. २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, त्यामुळे आता राष्ट्रवादीने सत्तेत यायचा विचार करू नये, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे. वाचक क्रमांक :