यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मनमानी कारभारा विरोधात आमरण उपोषणाचा इशारा,जेष्ठ पत्रकार एम जी शेलार

By : Polticalface Team ,12-11-2022

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मनमानी कारभारा विरोधात आमरण उपोषणाचा इशारा,जेष्ठ पत्रकार एम जी शेलार दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १२/११/२०२२,यवत पोलीस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या गालथान व मनमानी कारभारा संदर्भात जेष्ठ पत्रकार एम जी शेलार यांनी यवत पोलीस स्टेशन समोर लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग पत्करला आहे, यवत पोलीस स्टेशन येथे सरकारी फोरव्हीलर गाडी असताना देखील एक खाजगी वाहन भाड्याने घेतली आहे, यामध्ये दुमत नाही, परंतु या फोरव्हीलर वाहन चालकावर यवत पोलीस स्टेशन येथे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत व एक गुन्हा दाखल करण्यास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे टाळाटाळ करीत आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे

अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींला यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पाठीशी घालणे व वसुलीस ठेवणे योग्य आहे का ? असा सवाल जेष्ठ पत्रकार एम जी शेलार यांनी उपस्थित करुन त्याचे निषेधार्थ यवत पोलीस स्टेशन समोर सोमवार दि,१४ नोव्हेंबर २०२२ रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन संबंधित कार्यालयात देण्यात आले आहेत.

यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना समक्ष भेटून खाजगी वाहन चालकास तत्काळ बदलावा अशी विनंती केली असता, त्यांनी गुर्मीत उत्तरे देऊन तो गुन्हेगार सिद्ध झाला का ? असे बेतालपणे उलट सवाल करुन मी वाहन चालक बदलणार नाही,असे अहमपणे उत्तर दिले, असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, दौंड तालुक्यातील पंच्छिम भागात यवत पोलीस स्टेशन म्हणजे तालुक्याच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेले ठिकाण आहे, पाटस पासून ते बोरिऐदी पर्यंत पुणे सोलापूर महामार्गावरील मोठं पोलीस स्टेशन समजले जाते, पाटस केडगाव चौफुला आऊट पोस्ट पोलीस ठाणे आहेत त्यामुळे अधिक कामाचा भाग आहे, पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या वर नक्कीच ताण येतो मात्र जमेची बाजू ही तशीच आहे, काही वर्षांपूर्वी या ठिकाणी पोलीस निरीक्षक बनगड साहेब यांनी उत्कृष्ट कामगिरी केली जुन्या पोलीस ठाण्याचा चेहरा मोहरा च बदलून टाकला अतिशय सुंदर सभागृह मोठ मोठे ठाणेदार रुम बिट अंमलदार यांना वेगवेगळ्या खोल्या शौचालय वेटिंग रूम पिण्याचे पाणी तसेच साहेबांना मोठी इमारत वास्तू निर्माण केली, दौंड तालुक्यातील नंबर वन पोलीस स्टेशन केले, या नंतर अनेक पोलीस अधिकारी आले, परंतु कोणत्याही प्रकारची नव्याने निर्मिती केली नाही,या प्रश्नाकडे सर्वच दुर्लक्ष करीत आहेत, अनेक चांगल्या व वाईट बाबी सतत घडत असताना दिसुन येतात,या भागातील वाढती गुन्हेगारी लक्षवेधी ठरत आहे, युवा तरुण पीढी बिघडत चालली आहे, नको त्या कामात पोलीस प्रशासनाचा मोठा दिलासा मिळत असल्याने येणाऱ्या काळात तडजोडी दलाल, गुंडगिरी दहशत, भाई गीरी करणाऱ्या टोळ्या निर्माण होऊ लागल्या आहेत, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

( सतीच्या घरी बंत्ती आणि माधुरीच्या घरी हंत्ती ) अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे, त्यामुळे वेळेत सावध भुमिका घेऊन जेष्ठ पत्रकार एम जी शेलार यांनी पुढाकार घेऊन यवत पोलीस प्रशासनाचे डोळे उघडावे अशी सावध भूमिका घेतली आहे, या संदर्भात दौंड तालुक्यातील विविध वृत्तपत्राचे पत्रकार व विविध सामाजिक संस्था आणि पंक्ष संघटना राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या उपोषणाला बसण्या पुर्वीचा पाठिंबा दर्शविला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष