दौंड पोलीसांनी कोरोना काळात जमावबंदीचा कार्यवाही गुन्हे दाखल खटले, मागे घेण्यासाठी,उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी, आबासाहेब वाघमारे

By : Polticalface Team ,12-11-2022

दौंड पोलीसांनी कोरोना काळात जमावबंदीचा कार्यवाही गुन्हे दाखल खटले, मागे घेण्यासाठी,उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी, आबासाहेब वाघमारे दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,११/११/२०२२ दौंड तालुका बहुजन लोक अभियान महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा सुरेश उर्फ आबा अण्णा वाघमारे यांनी दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी सासवड येथे निवेदनाद्वारे दाखल खटले मागे घेण्या बाबत दिले आहे, दौंड तालुका शहर कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याने देशात व राज्यात अनेक नागरिकांवर ठिक ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन ग्रह विभाग यांनी सकारात्मक निर्णय घेऊन, दि,२० सप्टेंबर २०२२ रोजी कोरोना काळातील दाखल खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दौंड पोलिस अधिकारी यांनी जमावबंदीची कार्यवाही करायची म्हणून खोटे गुन्हे दाखल केले होते, त्या अनुषंगाने दौंड पुरंदर उपविभागीय अधिकारी सासवड यांच्याकडे निवेदनाद्वारे दाखल खटले मागे घेण्यासाठी मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासन ग्रह विभाग यांच्या कडील शासन निर्णय,जिआर क्र, १२२१/प्र, क्र,३५१/विशा-२ मंत्रालय मुंबई ४००,०३२,दि,२० सप्टेंबर, २०२२,रोजी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परिपत्रकानुसार भा दं वि कलम १८८,खटले मागे घेण्या बाबत दि २१/०२/२०२२,चे पत्राद्वारे कळविले आहे, महाराष्ट्र शासन ग्रह विभाग यांच्या कडील संदभिय शासन निर्णयाचे अवलोकन करण्याचे सुचित करण्यात आले आहे.

देशात व राज्यात माहे मार्च २०२० कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रसार कमी करण्यासाठी देशात सर्वव्यापी टाळेबंदी लागु करण्यात आली असून शासनाकडील महसूल, वने, व मदत पुनर्वसन,(आपत्ती व्यवस्थापन ) विभागाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी साथरोग नियंत्रण कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते, सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे दि,२१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२,पर्यंत देशातील व राज्यातील अनेक व्यक्तींवर, अ)भा दं वि,कलम १८८ अंन्वये, ब) सह साथरोग प्रतिबंध, आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंन्वये, क)सह २६९, किंवा २७०, किंवा २७१,सह साथरोग प्रतिबंध आपत्ती व्यवस्थापन, ड) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ सह १३५,या कलमा अंन्वेये देशातील व राज्यातील गुन्हे दाखल खटले, मागे घेण्यात आहेत येणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे, त्यामुळे वरील कालावधी पर्यंत दाखल झालेले खटले मागे घेण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यास शासनाने तत्वत मान्यता दिली आहे.

तसेच राज्यातील महसूल उपविभाग निहाय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्ष पदी उपविभागीय अधिकारी (महसूल) सदस्य पदी सहाय्यक संचालक अभियोग संचालनालय, आणि सचिव पदी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे, मात्र पुणे जिल्ह्यामध्ये सहाय्यक संचालक अभियोग संचालनालय हे एकच पद असल्यामुळे त्यांना प्रत्येक उपविभागात बैठकीसाठी जाणे शक्य नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथील सभागृहात दि,१० नोव्हेंबर रोजी दुपारी १२;३० वा,उपविभागीय अधिकारी, जुन्नर, आंबेगाव, खेड, पुणे, शिरूर, हवेली, व ११ नोव्हेंबर दुपारी १२ ;३० वा, उपविभागीय अधिकारी, मावळ, मुळशी, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर,भोर,आणि वेल्ला, यांच्या बैठकीचे आयोजित करण्यात आले होते, या वेळी शासन निर्णयामध्ये नमुद केलेल्या कोरोना काळातील प्रतिबंधनात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल खटले मागे घेण्यासाठी विहित केलेल्या अटींची पूर्तता होत असलेल्याने,दाखल खटल्यांची पोलीस स्टेशन निहाय यादी तातडीने तयार करून ते क्षेत्रीय समितीपुढे ठेवण्या बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सुचित करण्यात आले आहे, तसेच दौंड पोलीस स्टेशन येथील दाखल खटले संदर्भात आरोपींची नावे यादी न्यायालयात जमा करण्यात यावी अशी मागणीही आबा वाघमारे यांनी केले आहे.

दौंड पोलीसांनी दि,१६/०६/२०२० रोजी कोरोना काळातील दाखल खटले भा दं वि, कलम १४३,१४७, १८८,२६९,३४१,व १३५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले होते, त्या अनुषंगाने न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, मात्र अद्याप आम्हाला न्यायालयात हजर राहण्यासाठी कुठल्याही प्रकारचे समस किंवा आदेश आले नाहीत, दौंड पोलिसांनी जमावबंदीच्या आदेशाची कार्यवाही दाखवायची म्हणून आमच्यावर खोटा गुन्हा नोंदवला आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासन ग्रह विभाग यांच्या सकारात्मक निर्णय परिपत्रकाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक व जिल्हाअधिकारी यांना सदरील गुन्हे व दाखल खटले मागे घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.