By : Polticalface Team ,12-11-2022
चित्राताईंबद्दल काय बोलायला लावता? सर्वांना माहिती आहे चित्राताई नाही तर विचित्र ताई आहेत, अशा शेलक्या शब्दात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. ठाकूर या भारत जोडो पदयात्रेच्या नियोजनासाठी शेगाव येथे आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
पुढं बोलताना त्या म्हणाल्या, सध्या राज्यात हुकूमशाही सुरू आहे की काय असं वाटतं आहे. आमच्या जिल्ह्यातही एक खासदार आहे ज्यांना कोर्टाने वॉरंट बजावला आहे. कोर्टाने तंबी दिलेली आहे तरीसुद्धा त्यांना वाचवायचा प्रयत्न होत आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांना ज्याप्रमाणे अटक झाली यावर काय बोलणार,
इतिहासाची मोडतोड हे आरएसएस आणि भाजपवाले नेहमीच करत आलेले आहेत आणि ज्याप्रमाणे एखाद्या लोकप्रतिनिधीला एखाद्या माजी मंत्र्याला एखाद्या गोष्टीला विरोध करावासा वाटतो तर त्याला अटक केली जाते. असे ठाकूर म्हणाल्या वाचक क्रमांक :