By : Polticalface Team ,13-11-2022
कुवेतमध्ये एक तरुण अडकल्याची माहिती आमदार खापरे यांच्याकडून मिळाल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं सूचना दिल्या. त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयानं तत्परता दाखवत या तरुणाची सुटका होऊ शकली. सागर सुभाष संकपाळ (वय 28, रा. विजयनगर, कराड, जि. सातारा) हा तरुण कुवेत (दुबई) येथे जादा पगाराच्या अमिषानं कामासाठी गेला होता. सुमारे दीड महिना काम करुनही त्याला व्यवस्थित वेतन मिळाले नाही. त्याची तेथे दयनीय अवस्था झाली. कंपनीतील अधिकाऱ्यांना मायदेशी सोडण्याची मागणी केली. त्यांनी उलट त्याचा पासपोर्ट व मोबाईल जप्त केला.
भाजपाच्या आमदार उमा खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्यानं केंद्रीय विदेश मंत्रालयाशी तात्काळ पत्रव्यवहार केल्यानं सागरची 10 दिवसात सुखरुप सुटका झाली आणि तो मायदेशी परतला. आमदार उमा खापरे आणि सागरच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे दिल्ली येथील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सागर व त्याची सुटका करण्यासाठी धावपळ करणारे त्याचे बंधू रोहित यांच्यासह आमदार खापरे यांनी झालेल्या प्रकाराची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सागर संकपाळचं आयटीआयचं शिक्षण झालं असून तो सीएनसी बेन्डींग ऑपरेटरचं काम करतो. 42 हजार पगाराचं अमिष दिल्यानं सागरने नोकरी डॉट कॉमवर अर्ज करुन नाशिक येथील एका एजन्सीच्या माध्यमातून कुवेत येथे नोकरीसाठी 15 सप्टेंबर 2022 रोजी गेला. सागरने 16 सप्टेंबरपासून ‘दकील अलजेसर’ कंपनीत काम सुरु केले.
सागर म्हणाला की, तो सहकाऱ्याबरोबर स्वयंपाक करुन जेवायचा. परंतु त्याला खाण्याच्या पदार्थातून काही तरी दिले जात असल्याची शंका आली. अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याने कंपनीत अधिकाऱ्यांकडं मायदेशी परत सोडण्याची मागणी केल्यावर आपला पासपोर्ट व मोबाईल जप्त करण्यात आला.
आपण दीड महिना काम केलं असताना 15 दिवसांचाच पगार दिला. सागरवर शारिरीक अत्याचार करुन खोालीतून हाकलून दिले. त्यामुळं आपली मानसिक स्थिती बिघडल्याचं सागरनं सांगितलं. आपण बंधू रोहित यांच्या मी संपर्कात होतो. सागरचा मोबाईल लागत नसल्यानं १९ सप्टेंबरला बंधू रोहितनं प्रथम एजन्सीशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. रोहित यांनी सागरच्या अन्य सहकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सागरला बाहेर काढल्याची माहिती मिळाली. रोहितने भाजपाच्या आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खापरे यांनी विलंब न लावता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला.
खापरे यांनी वारंवार पत्रव्यवहाराचा पाठपुरावा केला. केंद्रीय विदेश मंत्रालयानं खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत सागरला मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली. याबाबत उमा खापरे म्हणाल्या की, मी प्रथम उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले. त्यांनी तात्काळ त्यांच्या दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांना संपर्क साधून विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यास सांगितला. आम्ही तात्काळ 1 नोव्हेंबरला पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केल्यानं त्याची सुखरुप सुटका झाली वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष