मी काय भ्रष्टाचार केला? हिंमत असेल तेवढे कारनामे बाहेर काढा; एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना आव्हान
By : Polticalface Team ,13-11-2022
जळगाव : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवरुन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय. जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांपैकी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आली होती. खडसेंना जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकटं पाडण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आलीय. या गुप्त बैठकीच्या बातमी समोर आल्यानंतर एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर प्रचंड घणाघात केला.
मी काय भ्रष्टाचार केला? तुमच्यात हिंमत असेल तेवढे माझे कारनामे बाहेर काढा. मी तुमचे जे कारणानामे काढले आहेत ते खरे ठरले आहेत. तुमचे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार आहेत. आधी त्यांच्या चौकशी करून जनतेसमोर या, असं आव्हान खडसेंनी महाजनांना दिलं.
ॲडव्होकेट बाळू पाटील यांनी जामनेर नगरपालिके अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी का थांबली? असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. भ्रष्टाचार करायचा आणि वरून लोकांना शिकवायचं? हे बरोबर नाही, अशी टीका खडसेंनी केली.
एक ग्रामपंचायतीची निवडणूक सोडून मी निवडणुकांमध्ये कधीही हरलो नाही. विधानसभेच्या निवडणुकीत मी सहा वेळा निवडून आलोय. मला तिकीट दिलं नाही, म्हणून निवडून येण्याचा विषय येत नाही, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
तुमची आज सत्ता आहे. तुमचे दोन मंत्री आहेत. आमदार तुमचे आहेत. नाथाभाऊ एकटा लढतोय. एकटं लढणं हीच मोठी ताकद आहे. हाच मोठा विजय आहे. मला पाडण्यासाठी पेट्या, खोकेवाला सर्व गोतावळा एक झालाय, असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला.
सर्व बोके एकत्र झाले तरी मी निवडून येऊन दाखवेन. जनता आपल्या पाठीशी आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. यांचा हेतू चांगला नाही. यांचा हेतू त्या दूध संघाला ओरबडणे हा आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. गिरीश महाजन यांना मी निवडण्याची भीती होती म्हणून मला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ दिले नाही, असा देखील दावा एकनाथ खडसेंनी केला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.