न्यायाधीश किंवा न्यायालय यांना चौकटीच्या बाहेर जाऊन काम करता येत नव्हते पण आता सहकारी न्यायाधीश गावोगावी जाऊन नागरिकांना कायद्याची जनजागृती करतात : न्यायमूर्ती संजय मेहरे

By : Polticalface Team ,14-11-2022

न्यायाधीश किंवा न्यायालय यांना चौकटीच्या बाहेर जाऊन काम करता येत नव्हते पण आता सहकारी न्यायाधीश गावोगावी जाऊन नागरिकांना कायद्याची जनजागृती करतात : न्यायमूर्ती संजय मेहरे श्रीगोंदा : न्यायाधीश किंवा न्यायालय यांना चौकटीच्या बाहेर जाऊन काम करता येत नव्हते मात्र आता आमचे सहकारी न्यायाधीश गावोगावी जाऊन नागरिकांना कायद्याची जनजागृती करत असल्याचे प्रतिपादन उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती संजय मेहरे यांनी केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा ,तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती तसेच तालुका वकील संघ श्रीगोंदा यांच्या संयुक्त वतीने आयोजित केलेल्या कायदेविषयक जनजागृती महाशिबीराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती संजय मेहरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती श्रीगोंदा मुजीब शेख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा न्यायाधीश , एन . जी . शुक्ल श्रीगोंदा बार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय झराड उपस्थित होते.

नागरिकांना घटनेने दिलेला अधिकार माहीत नसल्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना हे अधिकार माहीत करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हा न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी बोलताना सांगितले.

सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे प्रोटेक्शन करणे गरजेचे असल्याने प्रशासनाने देखील सक्षम होऊन योजनांची तसेच कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातच कायद्याची जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांनी बोलताना सांगितले. यावेळी आ.बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीम. भाग्यश्री पाटील यांनी प्रस्तावना केली. तर सूत्र संचलन ॲड. नितीन कुलकर्णी, ॲड. अशोक रोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीगोंदा न्यायीक अधिकारी, वकिल संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचा-यांचे यांचे सहकार्य लाभले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी