By : Polticalface Team ,14-11-2022
यावेळी पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, मुद्दे नसले की गुद्द्यांवर येऊन प्रत्येकवेळी नवा विषय उकरून काढत विरोधात बोलणाऱ्याला अटक कशी होईल हाच मनसुबा सत्ताधाऱ्यांचा आहे. साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर करून सत्ताधारी स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत.
राज्यातील जनतेचा अकार्यक्षम सरकारविरोधातील आक्रोश वाढला की स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि विरोधकांनी आवाज उठवला की त्यांचे तोंड बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यातील पोलीस यंत्रणा यांचा वापर करून दडपशाही सुरु आहे.
मात्र महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाटेतील काट्यांशी लढत आम्ही पुढे जाऊ, कारण महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आणि विश्वास आमच्या पाठीशी आहे. असा आत्मविश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला वाचक क्रमांक :