उसाच्या ट्रेलरला मोटरसायकलची धडकेने काष्टी येथील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू..

By : Polticalface Team ,14-11-2022

उसाच्या ट्रेलरला मोटरसायकलची धडकेने  काष्टी येथील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू.. श्रीगोंदा : तालुक्यात मागील वर्षी गळीत हंगाम सुरू असताना हॉटेल अन्यण्या जवळ उसाच्या गाडीला धकडून तीन जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील गावातील तीन तरुणांचा काल दि.१३रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील दौंड- पाटस रस्त्यावर गिरिम गावाजवळ (वायरलेस फाट्यानजीक) उसाच्या ट्रॅकटरला मोटारसायकलची धडक होवून झालेल्या अपघातात तिघा तरूणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

मागील वर्षी गळीत हंगाम चालू असताना हॉटेल अन्यण्या जवळ तीन जण धडकून ठार झाल्याची घटना घडली होती पुन्हा या वर्षी चालू गळीत हंगाम चालू असताना पुन्हा तीन जण उसाच्या ट्रॅक्टर ला धडकून जागीच ठार झाले आहेत यामध्ये ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ )स्वप्निल सतिष मनुचार्य (वय२४),गणेश बापु शिंदे (वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत हे तिन्ही तरुण काष्टी गावातील बाजारतळ परिसरात राहत होते या घटनेमुळे संपूर्ण काष्टी गावावर शोककळा पसरली असून आज संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

मयत झालेले तिन्ही तरुण काल रात्री दुचाकीवरून आपल्या घराकडे येत असताना उजव्या बाजुने समोरच्या वाहनाची प्रखर लाईट डोळ्यावर आल्यानंतर डाव्या बाजुने पुढे समोर विना रिफ्लेक्टर चाललेल्या उसाच्या ट्रॅकट अंधारात दिसला नसल्यामुळे एम,एच.१६ बी.पी.९२८० मोटारसायकल पुढे चाललेल्या ट्रॕक्टरला धडकली आणि यामध्ये स्वप्निल,ऋषीकेश,व गणेश या तिघांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेकटर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कडक कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. दौंड आणि श्रीगोंदा पोलिस यांची गांभीर्याने दखल घेतात हे आता पहाव लागेल. आतापर्यंत रिफ्लेक्टर चे ६ बळी ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक असताना ट्रॅक्टर ट्रक बैलगाडीतून ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने रिफ्लेक्टर लावत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आतापर्यंत रिफ्लेक्टर चे ६बळी गेले आहेत अजून किती बळी जाण्याची प्रशासन वाट पाहतेय असे नागरिकांतून बोलले जात आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष