By : Polticalface Team ,15-11-2022
घडलं असं की, रविवारी रात्री बस देऊळगाव राजा बसस्थानकात मुक्कामासाठी थांबली होती. बसचालक आणि वाहक हे बसस्थानकातील विश्रांती कक्षात झोपले होते. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं ही बस चालू करून पळवून नेली. देऊळगाव राजा बस स्थानकात मुक्कामी असलेली मानव विकास मिशनची बस अज्ञातानं बस स्थानकाच्या आवारातून गायब केली. पहाटे स्थानकात बस नसल्याचं लक्षात आलं, त्यानंतर बसची शोधाशोध सुरू झाली. याबाबद एसटी बसचालकानं देऊळगाव राजा पोलिसात तक्रार दिल्यानं एकच खळबळ उडाली.
बस चोरीच्या घटनेनं देऊळगाव राजा स्थानकातील अधिकारी देखील अवाक् झाले. सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर बस आढळून आली. बस सापडल्यानं चालक आणि वाहकाचा जीव भांड्यात पडला. बस अज्ञातानं सुरु करून चिखली मार्गाने जाताना बस स्थानकापासून दोन किलोमीटरवर एका गतिरोधकावर बसचा सेंट्रल जॉईंट निखळला. त्यामुळं नादुरुस्त अवस्थेत बस रस्त्यात उभी करुन पसार झाला. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन हे प्रकरण चौकशी सुरू केली असून पोलीस बस चोराचा शोध घेत आहेत वाचक क्रमांक :