By : Polticalface Team ,15-11-2022
ठाण्याच्या किसन नगर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले. ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. यावेळी शिंदे गटाचे शिवसैनिक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेदेखील घटनास्थळी उपस्थित होते.
हा राडा झाल्यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते श्रीनगर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येनं जमले होते. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन गुन्हा नोंदवून घेत आहेत. पोलीस ठाण्याच्या परिसरातही शिंदे समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. हे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले वाचक क्रमांक :