यवत येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाच्या वतीने, शेतकरी कृषी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांच्या हस्ते

By : Polticalface Team ,15-11-2022

यवत येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाच्या वतीने, शेतकरी कृषी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख  महेश दादा पासलकर यांच्या हस्ते दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता १५ नोव्हेंबर २०२२, दौंड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दौंड तालुक्यातील शेतकरी कृषी महोत्सव महिला बचत गट या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दि,१४ पासुन ते १७ रोजी पर्यंत होणार आहे, हिंदुहृदयसम्राट,शिवसेना प्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब_ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, शिवसेना दौंड विधानसभा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मा महेशदादा_पासलकर विचारमंच यांच्या वतीने या भव्य दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दौंड_तालुका_शेतकरी_कृषी_महोत्सव_२०२२" चे सोमवार दि. १४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.या कृषी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख माननीय महेश दादा पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी दौंड तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, मौजे यवत येथे कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना एकाच वेळी व एकाच जागी कृषी, कृषी औजारे, विविध बियाणे, ऑटोमोबाईल, गृह उपयोगी वस्तू, नवीन तंत्रज्ञान, लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने, महिला बचत गट गृहोपयोगी वस्तूचे प्रदर्शन इ. क्षेत्राशी निगडित आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती मिळावी या उद्देशाने दौंड तालुक्यात प्रथमच या कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेती व इतर क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायचा असेल तर त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी व इतर वर्गांना असणे गरजेचे आहे ही गरज लक्षात घेता ग्रामीण भागात प्रथमच शिवसेनेच्या वतीने या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील मान्यवर यवत ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच सुभाष यादव, शिवसेना विभागप्रमुख हनुमंत निगडे यवत शिवसेना शाखा अध्यक्ष अशोक दोरगे, दौंड तालुका शिवसेना युवक उपप्रमुख शुभम माळवे यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच नामदेव दोरगे, दोन काँग्रेस विधानसभा अध्यक्ष विठ्ठल दोरगे, यवत वि का सो चेअरमन रमेश यादव, सचिन दोरगे, डॉ संतोष बेडेकर, चंद्रकांत दोरगे, आण्णा दोरगे, प्रशांत खराडे रोहन दोरगे, दादा माने, राहुल फडके,आशोक जाधव, गणेश टेमगीरे निरंजन ढमाले अमित पवार,तुषार पवार,सुरज चोरगे, चिंतामणी मदने, विकास बधे अनिकेत चोभे,केतन चोभे प्रशांत खराडे, पोपट दोरगे, सोमनाथ दोरगे, दत्ता धुमाळ, दिपक तांबे ओमकार चोभे, युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने उपस्थित आहेत.


तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे, बैलांचा_रॅम्प_शो" चे दिनांक - १७/११/२०२२ रोजी आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकास सर्टिफिकेट व प्रथम तीन विजेत्यांना दौंडचा_राजा" या नावाने चषक देण्यात येईल. तसेच विविध विषयांवरील दालने व १५० हून अधिक उद्योगांनी व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष