भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशनचे प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन.श्रीगोंदा तहसील कार्यालयसमोर17 नोव्हें 2022 रोजी आंदोलनाचा इशारा

By : Polticalface Team ,15-11-2022

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशनचे  प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन.श्रीगोंदा तहसील कार्यालयसमोर17 नोव्हें 2022 रोजी आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा प्रतिनिधी ; उच्च न्यायालय मंबई यांनी नुकतेच गायराण जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश काढले आहेत तो महाराष्ट्र शासनाने स्वतः रेव्हिएव फेटिशन दाखल करून संबंधित आदेश रद्द करून गोरगरीब जनतेला उघड्यावर येण्यापासून वाचवावे याबाबतचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशने प्रांताधिकारी सुधाकर भोसले , तहसीलदार मिलिंद कुलथे , पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे कि तालुक्यातील अनेक गावामध्ये बऱ्याच कटुबांनी पिढ्यानपिढ्या गायरान जागेवर कच्ची पक्की घरे बांधल्याली आहे . याठिकाणी राहणारे अनेक कुटुंब हे भूमिहीन , भटके , विमुक्त , दलित , गोरगरीब समाज आहे ते दररोज मोलमजुरी करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिवाह करतात. मानवाच्या मूलभूत गरजेपैकी निवारा हा महत्वाची गरज आहे तालुक्यातील जवळपास सर्वच घरे लोकांनी आपल्या केलेल्या कष्टाच्या कमाईच्या बचतीतून बाधलेली आहेत. त्या ठिकाणची घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिले वर्षानुवर्षे नियमित भरत आहे. जर लोकांना घरे बांधायला असती तर त्यांनी गायरानामध्ये घरे बांधलीच नसती त्यांनी त्यांचा प्रपंच असा उघड्यावर कशाला चालवला असता. सरकारचे धोरण प्रत्येकाला घरे मिळावे हे आहे परंतु ते घरे बांधण्यासाठी जागाच नाही . तर घर बांधणार तरी कोठे? या शासनाने स्वतः विचार करायला पाहिजे. बांधलेली घरेही बऱ्याच प्रमाणात शासनाकडून आलेली घरकुल व इतर योजनेतून आलेली आहे. त्या जागेमध्ये बराच निधी वापरला गेला आहे . त्यामध्ये सिमेंटी रस्ते, गटार लाईन, पिण्याच्या पाण्याची नळ योजना , मोठमोठे हायमॅक्स यावरती बराच निधी शासनाने खर्च केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या पडीक गायरान जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण धारकांना मालकी हक्क देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी त्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे परंतु महसुली कर्मचाऱ्यांच्या उदासीनमुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे गोरगरीब जनतेला आतापर्यंत न्याय मिळू शकला नाही. सदर अतिक्रमण जरी गायरान जागेतील असले तरी ज्या प्रयोजनाकरिता राखून ठेवल्याल्या आहेत त्याकरिता वापर किती प्रमाणात केला जातो? त्याची खरोखर गरज आहे का? याचा देखील विचार शासनाने करावा.

तसेच ही घरे शासनाने नियमानुकूल करून देण्यात यावी योग्य तो सकारात्मक निर्णय तातडीने घ्यावा अन्यथा भ्रष्टाचार विरोधी संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी यांचे नेतृत्वाखाली दिनांक 17 नोव्हें 2022 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर सांगवी दुमाला गावातील सर्व ग्रामस्थ व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जनते सोबत आंदोलन करणार असल्याची निवेदनात म्हटले आहे . यावेळी भ्रष्टाचार विरोधी संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, सांगवी ग्रामस्थांसह श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.