गायरान अतिक्रमण धारकाचा संसार उघड्यावर पडू देणार नाही....
-ॲड.डॉ.अरुण जाधव
By : Polticalface Team ,15-11-2022
करमाळा प्रतिनिधी 15/11/2022 रोजी मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे संदर्भाने गायरान धारक आणि निवासी भोगवटा यांच्या बाजूने मा.ॲंड. डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून अतिक्रमण धारकांच्या वेदना शासन दरबारी मांडण्यात आल्या,
या जन आक्रोश मोर्चात अनेक,संस्था, संघटना, मंडळे साहभागी झाले होते,यावेळी प्रहार संघटनेचे लेंढे पाटिल, लोकअधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, शहर प्रमुख आजिनाथ शिंदे, विशाल पवार, भगवान गायकवाड, अंकुश पवार, घोडेश्वर मेजर, भीमराव सुरवसे, सोनेगावचे सरपंच पद्माकर बिरंगळ, सुरेश पवार, साधना पवार, दीपक साळवे, लखन मिसाळ, विकास बिरंगळ,फकीर शेख, दादा फौजी, मीना गायवळ ,सचिन भिंगारदिवे, संतोष चव्हाण सर वैजनाथ केसकर, राजू शिंदे संतोष चव्हाण ( ज्युनिअर ), मोहन देवकाते,विजय शिंदे, राजेंद्र शिंदे, बाळु शेळके, भगवान गायकवाड, दादा घायतडक,दादा देवकाते,विलास मिसाळ,अतुल ढोणे , ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते
सरकारी गायरान जमिनीवर मिळालेल्या मालकी हक्कामुळे अनेक दलित, आदिवासी, भटके विमुक्त, भूमीहीन, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी या गायरान जमिनीवर घरे उभे केली व त्या जमिनीमध्ये पिके घेऊन व स्वतःची उपजीविका भागवत आहेत, तसेच सरकारी जागेवर निवासी प्रयोजनासाठी केलेल्या अतिक्रमण धारक महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या मिळालेल्या घरकुलाचाही उपभोग घेत आहेत, सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना या जमिनी व्यतिरिक्त जगण्यासाठी कोणतेही ठोस साधन नाही, तसेच सरकारी जागेवर घर बांधून राहत असलेल्या परिवारांना ही या जागे व्यतिरिक्त राहण्यासाठी कोणतीही जागा नाही महाराष्ट्रातील शेती प्रयोजनासाठी जमीन विहित केलेली गायरान धारक आणि सरकारी जागेवर घरे बांधून राहत असलेले निवासी भोगवटादार यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा,
या अतिक्रमण धारक जनतेने ऊस तोडून, वीटभट्टी कामावर जाऊन मोलमजुरी करून कुटुंबाला निवारा मिळावा म्हणून परिस्थितीनुसार निवारा उभा केला आहे, तो मा.उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार पाडण्यात येणार आहेत असे अतिक्रमण लाभधारक जनतेस प्रशासनाकडून नोटीस दिल्यानंतर अतिक्रमण गायरान लाभधारक जनता चिंतेत पडली आहे,हि लोकं रात्रंदिवस विचार करू लागले आहे माता-भगिनींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले कोणी तर जेवण बंद केले आहे, असा धसक्का जनतेला बसला आहे,
या गोरगरीब कष्टकरी, दलित आदिवासी जनतेचा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी गायरानअतिक्रमण जनतेच्या वतीने ॲड डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे,
महाराष्ट्र सरकारने या अतिक्रमणधारकांच्या बाजूने रिट पिटीशन याचीका सुप्रीम कोर्टात दाखल करावी हे सांगण्यात आले आहे यासाठी आज तहसील कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.