यवत येथे प्रथमच शेतकरी कृषी प्रदर्शन महोत्सवात बैल जोडी रॅम्प,  खाऊ गल्ली, विविध प्रकारचे स्टॉल, नागरिकांची तुफान गर्दी
                      
                
            
               By : Polticalface Team ,15-11-2022
       
               
                           
              दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १५ नोव्हेंबर २०२२, यवत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे,   
हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय स्व, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त,यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर शेजारी शेतकरी कृषी प्रदर्शन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेना दौंड विधानसभा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मा महेशदादा_पासलकर विचारमंच यांच्या वतीने या भव्य दिमाखदार कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दौंड_तालुका_शेतकरी_कृषी_महोत्सव२०२२ चे सोमवार दि.१४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत पर्यंत सुरू आहे, या कृषी प्रदर्शनात विविध प्रकारच्या स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे, तसेच खाऊ गल्ली मध्ये उत्कृष्ट चिकन दम बिर्याणी, दालच्या साईस,चायनीज पदार्थ,तसेच कुंथलगिरी पेढा,विविध प्रकारचा चखना, अशा अनेक स्टॉलची निर्मिती करून येवत पंचक्रोशीतील नागरिकांस विक्री साठी उपलब्ध करण्यात आले आहे, महिला वर्गांसाठी विविध प्रकारच्या नामांकित कंपनीचे सौंदर्य वस्तू तसेच घरगुती अनेक साहित्य उपलब्ध आहेत,
तसेच नागरिकांसाठी आयुर्वेदिक औषधी सर्व प्रकारच्या रोगावर रामबाण उपाय हरबल प्रॉडक्ट श्री तुलसी पीये और स्वस्त जीए, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी फळबागा आहेत, त्यात भर टाकनारी म्हणजे सफरचंद रोपे आपल्या महाराष्ट्रात 40 ते 48 डिग्री तापमाना मध्ये येणारी रोपे उपलब्ध आहेत.
शेतकरी बांधवांना शेती संदर्भात महत्त्वाचे शेती काम आवजरे, विविध कंपनीचे ट्रॅक्टर, प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जनावरांना उच्च दर्जाचा पोषक आहार समृद्धी सर्वोत्तम पशु आहार, उपलब्ध करण्यात आले आहेत,
यवत येथे कृषी प्रदर्शन महोत्सवात शेतकऱ्यांना एकाच वेळी व एकाच जागी कृषी, कृषी औजारे, विविध बियाणे,ऑटोमोबाईल, गृह उपयोगी वस्तू, नवीन तंत्रज्ञान, लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने, महिला बचत गट गृहोपयोगी वस्तूचे भव्य स्टॉल प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांसाठी शेती संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाची महत्त्वाची माहीती मिळावी या उद्देशाने दौंड तालुक्यात प्रथमच यवत पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना व नागरिकांच्या हिताचे आणि घरगुती निगडीत महत्त्वाच्या वस्तू या कृषी प्रदर्शन महोत्सवात उपलब्ध आहेत.
या यवत येथे कृषी प्रदर्शन महोत्सवात शेतकरी नागरिक महिला मुलांना घेऊन प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत, 
यवत येथे पालखी स्थळ मैदानात बुधवार -गुरुवार खिल्लारी बैलांची रॅम्प प्रदक्षिणा भरवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे, प्रथम तृतीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या बैल जोडीला सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,
यवत येथे कृषी प्रदर्शन सोमवार दि १४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर,२०२२, या कालावधी पर्यंत सुरू आहे,
या कृषी प्रदर्शन महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
या प्रसंगी यवत पंचक्रोशीतील मान्यवर यवत ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच सुभाष यादव, शिवसेना विभागप्रमुख हनुमंत निगडे यवत शिवसेना शाखा अध्यक्ष अशोक दोरगे, दौंड तालुका शिवसेना युवक उपप्रमुख शुभम माळवे यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच नामदेव दोरगे, दोन काँग्रेस विधानसभा अध्यक्ष विठ्ठल दोरगे, यवत वि का सो चेअरमन रमेश यादव, सचिन दोरगे, डॉ संतोष बेडेकर, चंद्रकांत दोरगे, आण्णा दोरगे, प्रशांत खराडे रोहन दोरगे, दादा माने, राहुल फडके,आशोक जाधव, गणेश टेमगीरे निरंजन ढमाले अमित पवार,तुषार पवार,सुरज चोरगे, चिंतामणी मदने, विकास बधे अनिकेत चोभे,केतन चोभे  प्रशांत खराडे, पोपट दोरगे, सोमनाथ दोरगे, दत्ता धुमाळ, दिपक तांबे ओमकार चोभे, युवा तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यवत नागरिकांच्या सेवेसाठी प्रामुख्याने उपस्थित होते,
तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे, बैलांचा_रॅम्प_शो" चे दिनांक - १७/११/२०२२ रोजी आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकास सर्टिफिकेट व प्रथम तीन विजेत्यांना     दौंडचा_राजा" या नावाने चषक देण्यात येईल. तसेच विविध विषयांवरील दालने व १५० हून अधिक उद्योगांनी व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष