By : Polticalface Team ,16-11-2022
यावेळी दादरमधील राजगृहमध्ये दाखल होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांनी अभिवादन केलं. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि आंबेडकरांमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेनंतर ही कोणतीही राजकीय भेट नसून बाबासाहेबांच्या स्मारकासंदर्भात चर्चा झाल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय.
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना आघाडी करण्याबाबत प्रस्ताव ठेवला आहे, मात्र, ठाकरेंकडून या प्रस्तावाला अद्याप कोणतंही प्रत्युत्तर आलेलं नाही. शिंदे-आंबेडकर भेटीनंतर राजकीय चर्चांना नवं उधाण आलं आहे, प्रकाश आंबेडकर शिंदे गटाशी युती करणार काय? असा सवाल त्यांच्या या भेटीनंतर उपस्थित होत आहे.
भेटीनंतर यामागे कोणतंही राजकीय समीकरण नसून ही एक सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले, राजगृह येथे ऐक वेगळं समाधान लाभलं आहे. ही वास्तू पवित्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून ही वास्तू निर्माण झाली आहे. हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. ही सदिच्छा भेट आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात कोणतेही राजकीय समीकरण नाही. ही एक सदिच्छा भेट असल्याची त्यांनी स्पष्ट केलं. वाचक क्रमांक :