धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

By : Polticalface Team ,16-11-2022

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या धुळे : पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रविण कदम असं या पोलीस निरीक्षकाच नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण कदम यांनी सुसाईड नोट लिहून ठेवले असल्याचे उघड झाले आहे.

धुळे येथे पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांनी गळफास लावून आत्महत्या केली. प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास घेतला असून आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही.

या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ होत आहे. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये एक सुसाईड नोट आढळून आली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये एका अपघाताचा योग्य प्रकारे तपास झाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय बारकुंड यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या आत्महत्या केलेल्या घरी भेट देऊन पाहणी केली.

पोलीस निरीक्षक प्रविण कदम यांचा मृतदेह हिरे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. की याला मी जबाबदार आहे, यास कोणीही जबाबदार नाही. गंगापूर पो.स्टे. येथे फेटल गुन्हा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. प्रवीण कदम यांनी लिहिलेल्या या धक्कादायक सुसाईड नोटमुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्यामुळे गंगापूर पोलीस ठाण्यात कोणता गुन्हा चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आला तसेच यामागे त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? या सर्व गोष्टी आता पुढे आल्यावरच समजतील. प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली व या सुसाईड नोटचा त्यांच्याशी काय संबंध आहे. या सर्व गोष्टींचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी