आवाटी येथे गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय व शांततेच्या वातावरणात संपन्न राज्यभरातील लाखो भक्तगणांनी घेतला लाभ

By : Polticalface Team ,18-11-2022

आवाटी येथे गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय व शांततेच्या वातावरणात संपन्न राज्यभरातील लाखो भक्तगणांनी घेतला लाभ करमाळा प्रतिनिधी आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गाह मध्ये ग्यारहवी शरीफ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौसे आजम कार्यक्रमाला उस्फूर्त व मोठा प्रतिसाद मिळाला सदर कार्यक्रमाचा लाभ राज्य तसेच परराज्यातील लाखो भावीकांनी घेतला ग्यारहवी शरीफ निमित्त बगदाद शरीफ येथील गौसेपाक यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी आवाटी येथील दर्गाह मध्ये गौसे आजम चा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो यामध्ये यावर्षी लाखो भाविकांनी गौसे आजम च्या गिलाफे मुबारक चादरीचा तसेच मुये मुबारक चे दर्शन घेतले याशिवाय हजारो भक्तगणांनी मुरीद होण्याच्या कार्यक्रमात सहभाग दर्शविला आलेल्या भक्तगणांना लंगर खाना चे आयोजन करण्यात आले होते याशिवाय अनेक भक्तगणांनी तोषेकी नियाज या उपक्रमात सहभाग दर्शवून मोठ्या संख्येने हजेरी लावली होती गौसे आझम निमित्त दर्गाह परिसरात विद्युत रंगाच्या विद्युत रोषणाई करण्यात आली होती याशिवाय आलेल्या भक्तगणांना पार्किंगची व्यवस्था तसेच राहण्याची व्यवस्था दर्गाह कमिटीच्या वतीने करण्यात आली होती या कामी करमाळा पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील सहकार्य केले गौसे आजम कार्यक्रमा निमित्ताने दर्गाह मध्ये वली बाबा चे खादिम गुलाम नबी कादरी यांनी फातीहाखाणी केली यावेळी त्यांच्या समवेत इरफान कादरी तसेच वली बाबाचे लाडके दुलारे हसनैन कादरी हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला आलेल्या तसेच दर्गाहला भेटी दिलेल्या अनेक मान्यवरांचे दर्गाह ट्रस्ट तसेच आवाटी ग्रामस्थ यांच्या वतीने पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दर्गाह ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र विशेष परिश्रम घेतले एकंदर पाहता आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये गौसे आजम चा कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात तसेच लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये शांततामय पद्धतीने साजरा करण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी यांनी दिली
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी