By : Polticalface Team ,18-11-2022
रूग्णवाहिकेतून रूग्णालयात नेले जात असताना आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण विचारण्यात आले असता बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी हा प्रियकर मंत्रालयाचे उंबरठे झिजवत होता. मागील तीन वर्षांपासून त्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले.
हा प्रियकर बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील रहिवासी आहे. आत्महत्येच्या प्रयत्नात तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. सध्या उपचाराकरिता त्याला जे जे रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे.
मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला गेला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे सदर तरुणाचा जीव वाचला. तरुणाने जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालय परिसरातील विविध मजल्यांवरील कर्मचारी तसेच सामान्य नागरिक ते पाहण्यासाठी बाहेर आल्याचंही दिसून आलं. दरम्यान याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे. वाचक क्रमांक :