यवत येथे खिल्लार बैलांचे रॅम्प वॉक स्पर्धा परीक्षेत, पाटावर एक पाय ठेऊन मालकाचे चुंबन, घेणाऱ्या बैल जोडीने पटकावली प्रथम क्रमांकांची ट्रॉफी, सन्मानपत्र
By : Polticalface Team ,18-11-2022
दौड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,१७ नोव्हेंबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे यवत येथे
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश दादा पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शाखा यवत यांच्या वतीने वंदनीय स्व.हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त यवतमध्ये भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्रा राज्यातील दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे, ग्रामीण भागात प्रथमच बैल रॅम्प वाॅक स्पर्धा परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात खिल्लारी बैल या गावरान देशी जातीची कमतरता दिवसांन दिवस कमी होत चालली आहे, हि अतिशय दुर्दैवी परिस्थिती निर्माण होत चालली आहे, देशी गावरान जनावरांची संख्या लक्षात घेता त्यांची जोपासना व जतन व्हावे, हि काळाची गरज ओळखून व उद्दिष्ट लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या संकल्पनेतून भव्य शेतकरी कृषी प्रदर्शनात बैल रॅम्प वाॅक शो स्पर्धाचे नियोजन शिवसेना शाखा यवत यांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये जवळपास ५२ पेक्षा जास्त खिल्लारी बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व मानाची ट्रॉफी पटकावणाऱ्या बैल जोडीला व मालक -संतोष बापुराव कोकणे रा,(नंदादेवी) ता दौंड जिल्हा पुणे, यांनी सदगुणी खिल्लारी बैल जोडीला मानाची ट्रॉफी सन्मानपत्र आणि गोदरेज ऍग्रो वेट यांच्यामार्फत खास उच्च दर्जाचे बैल पशु आहार बॅग जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला,
द्वितीय क्रमांक यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच -सदानंद वामन दोरगे, यांच्या खिल्लारी बैल जोडीने मिळवला आहे, तसेच खिल्लारी बैल, लहान गटात, प्रथम क्रमांक यवत गावातील शेतकरी छबन महादेव कुदळे, यांच्या तंदुरुस्त खिल्लारी खोडाला मिळाला असून त्यांना मानाची ट्रॉफी सन्मानपत्र
शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या किल्लारी बैल जोडी रॅम्प वॉक स्पर्धा परीक्षक, डॉ बबनराव तेजनकर (पशुधन विकास अधिकारी पुणे) व डॉ संतोष बडेकर (पशुधन पर्यवेक्षक) डॉ, अमोल नागवडे, डॉ नवनाथ शितोळे,यांनी पंच म्हणून काम पाहिले. यामध्ये परीक्षकांनी खिल्लारी बैल जोडी रॅम्प वॉक करताना बैलांची सखोल तपासणी चौकशीत सदगुणांचा विचार पुर्वक निर्णय घेऊन देशी गावरान खिल्लार बैलांची निवड करण्यात आली, तसेच शिवसेनाप्रमुख वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे अवचित साधून
जवळपास १०० पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले, प्रत्येक रक्तदात्यास वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा व प्रमाणपत्र भेट देण्यात आले.
यावेळी शिवसेना शाखाप्रमुख मा. अशोक दादा दोरगे, शिवसेनेचे मा. सचिन दादा दोरगे, शुभम माळवे, प्रशांत खराडे, पोपटराव दोरगे, दिगंबर दोरगे, सर्जेराव दोरगे, हेमंत दोरगे, धनंजय दोरगे, शंकरराव शितोळे, राहुल खैरे, विकास बधे, दत्तात्रय धुमाळ, ओकांर चोभे, दत्तात्रय कुल, आदी शिवसैनिक पदाधिकारी, शेतकरी, पत्रकार, महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
गेल्या ४ दिवसापासून सुरू असलेल्या शेतकरी कृषी प्रदर्शन महोत्सवाला यवत पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या शेतकरी कृषी प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन देखरेख प्रस्ताविक सूत्रसंचालन मुक्ताई अग्रोनिक सीमा कल्याणकर यांनी केले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.