मुळा मुठा कालव्यातील सिमेंट काँक्रेटी करणामुळे हवेली, दौंड, इंदापूर, तालुका कालव्यातील पाणी गळती पाझर होणार बंद
By : Polticalface Team ,19-11-2022
दौड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १९ नोव्हेंबर २०२२, पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणातून मुळा मुठा कालव्यातील पाण्याची गळती पाहता, संबंधित विभागाने कालव्यातील सिमेंट काँक्रेटीकरण निर्णयामुळे, हवेली, दौंड, इंदापूर, तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत, वास्तविक पाहता, खडकवासला मुळा मोठा कालव्यातील पाण्यावर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे भवितव्य अवलंबून आहे.
मुळा मुठा कालव्यातील होणाऱ्या सिमेंट अस्तरीकरणामुळे पूर्णपणे पाणी गळती पाझर बंद होणार आहे, त्यामुळे हवेली, दौंड, इंदापूर, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरी बोरवेल ठण ठण गोपाल म्हणने वावगे ठरणार नाही, मुळा मुठा कालव्यातील पाणी पाझर स्वरुपात ओढे नाले विहीर बोरवेल मध्ये पर्कुलेशन होत असल्याने या भागात शेती बागायत पट्टा असल्याचे बोलले जात आहे, आता मात्र दौंड तालुक्यातील बागायत शेती भविष्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरणार आहे, शेतकरी शेतीच्या पाण्यावाचून अडचणीत येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसुन येत आहे.
तसेच यवत पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतींना माटोबा तलाव पाण्याचे पाणी पुरवठा एक मात्र पर्याय उपलब्ध आहे, या तलावात सुद्धा मुळा मुठा कालव्याचे पाणी साठा केला जातो, या भागातील अनेक गावांना मातोबा तलाव हा वरदान ठरत असला तरी मुळा मुठा कालव्यावर अवलंबून आहे, शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतील विहिर बोरवेला कालव्यातील पाझर परकुलेशन होणारा पाण्याचा मोठा आधार होता, मात्र मुळा मुठा कालव्यातील सिमेंट काँक्रेट अस्तरीकरणामुळे आता पाणी गळती व पाझर परकुलेशन बंद होणार असल्यामुळे विहीर बोरवेल मध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणार आहे, कालव्यातील पाण्याचा झरा पाझर बंद होणार असल्याने शेत जमिनीतील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे, पर्यायाने शेती व्यवसाय धोक्यात येणार असल्याचे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे.
मुळा मुठा नवाकालवा पश्चिमेकडून पूर्वेकडे हवेली, दौंड तालुक्यातुन वाहत इंदापूर तालुक्यात जात आहे, दौंड तालुक्यातील कालव्याच्या उत्तरेकडे नदी वाहत आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळत आहे, मात्र दक्षिणेकडील शेतजमीन ही जिराईत पट्टा असल्याने विहीर बोरवेलची पाण्याची पातळी खोलवर असून या भागातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचे लिफ्ट मुळा मोठा कालव्यावर आहेत, तसेच जानाई शिरसाई सिंचन प्रकल्प सुरू असल्याने या भागातील शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध आहे.
यवत पंचक्रोशीतील सर्व भागात मुळा मुठा कालव्यावर शेतकरी व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, यवत पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायत गावठाणातील सर्वसामान्य नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे मोठी कसरत करावी लागणार आहे, यवत पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या पाणी साठवण तलावाची दुरुस्ती रुंदी व खोली करण करणे आवश्यक असल्याची चर्चा होत आहे.
त्यामुळे या भागातील ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ पुढील काळात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी