By : Polticalface Team ,19-11-2022
रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते.
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ पार पडला. यावेळी बोलतांना कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहे. कोश्यारींच्या विधानावर राज्यभरातून टिकेचा भडीमार होत आहे.
राज्यपालांच्या विधानावर बोलतांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, वादग्रस्त विधान करून कोश्यारी यांना चर्चेत राहणे आवडत असते. त्यांनी आत्तापर्यंत जी काही विधानं केली आहेत, ती महाराष्ट्राची मान खाली घालणारी आहेत वाचक क्रमांक :