एक दिवसाच्या आत वीज कनेक्शन पूर्ववत न जोडल्यास सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार- युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांचा इशारा!

By : Polticalface Team ,19-11-2022

एक दिवसाच्या आत वीज कनेक्शन पूर्ववत न जोडल्यास 
  सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार-  युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांचा इशारा! करमाळा प्रतिनिधी सक्तीच्या वीज बिल वसुली साठी महावितरण कडुन शेतकऱ्यांना पुर्व सुचना न देता सरसकट (डिपी) रोहित्र सोडवुण वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आगोदरच ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांची खरीप पिके शेतातच सडुन गेली आहेत. त्याचे पंचनामे सुरु आहेत,रब्बी हंगाम वाया गेला आहे. शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे आशा परस्थीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी ओल्या दुष्काळाने भरडलेल्या शेतकऱ्यांची वीज कट करुन शिंदे -फडणवीस सरकार शेतकऱ्यांची कृर चेष्टा करत असुन एक दिवसाच्या आत वीज कनेक्शन पूर्ववत नाही केले तर युवासेनेच्या वतीने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळे दहन केले जातील असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे. या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की ओल्या दुष्काळा बरोबर मुक्या जनावरांना लंपी आजार झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला, अनेकांचे पशुधन दगावले तर अनेकांचा उपचारांसाठी हजारो रुपय खर्च झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना देखील वीज कनेक्शन कट करण्यात येत होते त्यावेळेस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आम्ही शेतकऱ्यांचे कनेक्शन कधीच कट केले नाही असे सांगून महाविकास आघाडी सरकार वर टिका करत होते .आज ते सत्तेत आहेत व विशेष म्हणजे करोडो रुपय खर्चून अनेक आमदारांना चार्टर्ड प्लेन ने सुरत गुवाहाटी येथे फिरवून त्यांनी सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापन करण्यात जेवढा खर्च झाला असेल तेवढ्यात शेतकऱ्यांचे वीजबिल माफ झाले असते परंतु विरोधात असताना आंदोलनाची भाषा आणी सत्तेत आल्यानंतर सक्तीने वसुली हे दुटप्पी पणाचे लक्षण आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार असताना मार्च महिन्यात वीज कनेक्शन कट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तिन महिने मुदत वाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता .त्यावेळेस विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल करत होते ते आज उपमुख्यमंत्री आहेत व खऱ्या अर्थाने तेच सरकार चालवत आहेत मग आज ते गप्प का आहेत असा सवाल देखील युवासेनेकडुन उपस्थित करण्यात आला आहे. या निवेदनात शेवटी फरतडे यांनी म्हटले आहे की सध्या उसतोडणी सुरु आहे अनेक उसतोड मजुर वाडीवस्तीवर कोप्या करुन रहात आहेत.वीज कनेक्शन कट झाल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. ज्यांचे उस तोड झाली आहे त्यांना नवीन फुटला होण्यासाठी तसेच ज्यांनी ज्वारी, हरभारा ,व जनावरांसाठी हिरवा चारा केला आहे त्यांना पाणी देणे गरजेचे असताना शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत आहे .उसबील आल्यानंतर शेतकऱ्यांकडून टप्पे पाडून वसुली करावी व तात्काळ वीज कनेक्शन पूर्ववत करावेत आशी मागणी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.