By : Polticalface Team ,20-11-2022
राऊत म्हणाले, शिवरायांबाबत केलेलं विधानामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. त्याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आहेत, त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळी कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपाचे आता सहयोगी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत. छत्रपतींनी माफी मागितली तर पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत जयजयकार का करतात? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
स्वाभिमानाचे तुणतुणे वाजवत भाजप बरोबर गेलेत, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आणि 40 लोकं निषेद्ध करु शकले नाहीत. भाजपनं केलेला अपमान आहे, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता.
आम्ही मविआत गेलो आणि स्वाभिमान दुखावला म्हणून तुम्ही भाजप बरोबर गेलेत ना? इथे अधिकृतपणे भाजपनं आणि राज्यपालांनी अपमान केलाय. शिवरायांना माफीवीर म्हटले तरी गप्प आहेत, महाराष्ट्र तुमच्यावर थुंकत आहे. एका वर्षात राज्यपालांनी चारवेळा अपमान केला आहे. शिवरायांचा अपमान भाजपच करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली वाचक क्रमांक :