आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत अक्षय झाला पोलिस उपनिरीक्षक, उक्कडगाव चा सुपुत्र अक्षय महादेव महाडिक ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा...

By : Polticalface Team ,20-11-2022

आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत अक्षय झाला पोलिस उपनिरीक्षक, उक्कडगाव चा सुपुत्र अक्षय महादेव महाडिक ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा... प्रतिनिधी श्रीगोंदा- तालुक्यातील उक्कडगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सुपुत्र अक्षय महादेव महाडिक याची राज्य उत्पादन शुल्क विभागात एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा क्रमांक मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने उक्कडगाव ग्रामस्थ व मित्रपरिवाराने त्याची वाजत गाजत मिरवणुक काढत आनंद व्यक्त केला.

अक्षय लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू मुलगा होता .प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगाव यथे झाले. इयत्ता सातवी मध्ये असताना राज्याच्या गुणवत्ता यादीत तो चमकला होता. हे सर्व करयासाठी त्याला त्याचे गुरू प्रवीण ठुबे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तर माध्यमिक शिक्षण श्री मुंजोबा विद्यालय उक्कडगाव यथे झाले. 11 वी व 12 वी विद्याधाम प्रश्नाला शिरूर येथे झाले. लोणी प्रवरा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी त्याने प्राप्त केली. ही पदवी असताना देखील त्याच्या डोळ्यासमोर अधिकारी होण्याचे स्वप्न होते . पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांचा आदर्श समोर ठेऊन त्याला प्रेरणा मिळाली आणि अक्षय ने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.हे सर्व शिक्षण घेत असताना त्याचे आई वडील यांचे त्याला घडवण्यासाठी करत असलेले कष्ट त्याच्या डोळ्यासमोर होते. त्यांच्या कष्टाची जाण ठेवल्याने आज अक्षयची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने आई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.आज ओबीसी प्रवर्गातून ग्रामीण भागातील उक्कडगाव सारख्या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातील तरुण पोलीस उपनिरीक्षक झाल्याने गावाने पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली.

अक्षयच्या या निवडीबद्दल माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी चे नेते घनश्याम शेलार,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, युवाउद्योजक सचीन कातोरे, बारामती चे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, यांच्यासह उक्कडगाव चे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
आई वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून लागेल ती मदत केल्याने आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले. त्याचबरोबर गुरुजन प्रवीण ठुबे व शिंदे मॅडम तसेच सिद्धी क्लासेस चे केशव कातोरे सर यांनी विशेष मार्गदर्शन केल्याने माझे स्वप्न साकार करण्यास मदत झाली.जिद्द आणि मेहनतीच्या,चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही. - अक्षय महादेव महाडिक,पोलिस उपनिरीक्षक

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष