By : Polticalface Team ,21-11-2022
नेमकं ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे? “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं,” असा दावा तुषार गांधी यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना तुषार गांधी म्हणाले कि मी आरोप करत नाही. इतिहासात जे लिहिले आहे ते मी सांगितले आहे. "पोलिसांच्या एफआयआरनुसार नथुराम गोडसे आणि विनायक आपटे 26-27 जानेवारी 1948 च्या सुमारास सावरकरांना भेटले. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो मुंबईभर फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्ली आणि तेथून ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरमध्ये त्यांची भेट सावरकरवादी परचुरे यांच्याशी झाली. यानंतर त्याला पिस्तूल मिळाले. हा सर्व प्रकार बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी घडला वाचक क्रमांक :