By : Polticalface Team ,21-11-2022
खासदार उदयनराजे भोसले यांनी नालासोपाऱ्यातील मराठा उद्योजक लॉबीच्या पाचव्या वर्धापन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दाखवली. यावेळी त्यांनी मराठी उद्योजकांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देत उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी खासदार भोसले यांनी शिवाजी महाराजांबद्दलच्या राज्यपालांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला.
यावेळी भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिले. सुधांशु त्रिवेदी याला चप्पलने मारायला पाहिजे तर कोश्यारी यांना आता राज्यपाल पदावरून खाली उतरवायला पाहिजे असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले. महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या सुधांशु त्रिवेदी व भगतसिंग कोशियारी यांनी जाहीर माफी मागावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली असल्याचे सांगितले वाचक क्रमांक :