मुलींनी साडी नेसण्याच्या विधानावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, संपूर्ण भाषण ऐकण्याचं केलं आवाहन
By : Polticalface Team ,21-11-2022
पुणे : खासदार सुप्रिया सुळेंच्या चॅनेलमधील मुलींनी साडी नेसण्याबद्दल विधानावरून अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली. यावर आता खुद्द सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, माझं 35 मिनिटांचं जर भाषण 17 सेकंदामध्ये दाखवण्यात येत असेल तर त्यावर काय बोलणार? तरीही टीका करणं चुकीचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
टीकेवर स्पष्टीकरण देताना सु्प्रिया सुळे म्हणाल्या, माझं भाषण सुरू होण्यापूर्वी तिथे एक व्यापक चर्चा सुरू होती. त्याला उद्देशून मी अनेक मुद्दे मांडले. मी या भाषणात कोणावरही टीका केली नाही. मी फक्त माझं मत मांडलं. कोणी काय घालावं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे ते भाषण सर्वांनी पूर्ण ऐकावे. माझं 35 मिनिटांचे जर भाषण 17 सेकंदामध्ये दाखवलं जात असेल तर त्यावर काय बोलणार, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.
चित्रा वाघांना उत्तर देताना सुप्रिया सुळे संविधानावर विश्वास असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, कोणी माझ्यावर टीका करत असेल, तर त्यात चुकीचं काहीही नाही. तो त्याचा अधिकार आहे. माझी आई मला नेहमी सांगते की, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ त्यामुळे अशा टीकेचं मी स्वागत करते, असंही त्या म्हणाल्या.
राज्यपालांच्या विधानाचाही सुळेंनी निषेध केला. राज्यपालांकडून जी विधानं होत आहेत, हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे. त्या पदाला न शोभणारा हा प्रकार आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळं बोट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे दुर्देवी आहे. सातत्याने महाराष्ट्राची बदनामी होत आहे, असं त्यांनी बोलताना सांगितलं.
पुण्यातील नवले पुलावरील अपघातस्थळाची सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, नवले पुलावरील अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रस्त्याची रचना, महापालिकेकडून फूटपाथ, सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे. या मार्गावर अपघात का होतात? याची योग्य माहिती घेऊन रोड एक्स्पर्टकडून त्रुटी दूर करायला हव्यात, असंही त्या म्हणाल्या
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी