By : Polticalface Team ,21-11-2022
भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय हे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याचबरोबर ते यावेळी म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कार्यक्रमात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. असं उद्धव ठाकरे म्हणाले पण हा मोठा विनोद आहे. उरला सुरला शिल्लक राहिलेल्या पक्ष वाचवण्यासाठी ठाकरे प्रयत्न करत आहेत. बाळासाहेबांच्या नावाशिवाय काहीच करत नाहीत. पक्ष वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे. अशी मिश्कील टीकाही केशव उपाध्याय यांनी केली.
दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्या संभाजी बिग्रेड सोबत युती, काँग्रेस समोर गुडघे टेकले, सत्तेसाठी स्वाभिमान सोडून दिला. लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारतात . स्वतःच्या पक्षात लोकशाही आहे का? बाळासाहेबांची पुण्याई आणि भाजपच्या साथेमुळे सत्तेपर्यंत पोहचले. कशाचं सोयर सुतक नाही. जो सोबत येईल त्याला घेऊन पक्ष वाचवण्यासाठी धडपड आहे. असं ही उपाध्याय म्हणाले वाचक क्रमांक :